सुसाट दुचाकी चालवणे तरुणाला पडले महागात; दुभाजाकावर आदळताच गेले प्राण  

सुसाट दुचाकी चालवणे तरुणाला पडले महागात; दुभाजाकावर आदळताच गेले प्राण  
Updated on: 

जळगाव : मित्रांसोबत शिरसोलीकडून परत येत असताना रोडवरील बॅरिकेटला दुचाकी आदळल्याने मागे बसलेला प्रशांत चौधरी (रा. नेरी ता. जामनेर) हा जागीच ठार झाल्याची घटना २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी दुचाकीधारक विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रशांत रामकृष्ण चौधरी (४०, रा.नेरी ता.जामनेर) हा जळगाव शहरातील महेश सुभाष बागुल यांच्याकडे सोनार काम करीत होता. सोमवार(ता. २९ मार्च) रोजी संध्याकाळी तो योगेश सुरेश जाधव याच्यासोबत दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एच.९९९०) शिरसोली येथे जेवणाला गेला होता तेथून परत येत असताना सायंकाळी पाच वाजता लुंकड कंपनी जवळ वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी बॅरिकेट्सवर धडकली.

प्रशांत चेंडू सारखा फेकला गेला

दुचाकीवरील नियंत्रण सुटताच गाडी दुभाजकाला धडकली. आणि मागे बसलेला प्रशांत चौधरी हा चेंडू सारखा फेकला गेला.  त्याच्या डोक्यात बॅरिकेट्सचे अँगल लागून मेंदू बाहेर आला. त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाला. तर, योगेश जाधव हा जखमी झाला. दोघांना जिल्हा रुग्णालय दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशांत त्याला मृत घोषित केले. दरम्यान महेश बागुल यांच्या फिर्यादीवरून योगेश जाधव रा. जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र राठोड करीत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com