Jalgaon MIDC News : चिंचोली-पिंपळे, कुसंबे येथे अतिरिक्त ‘एमआयडीसी’; लवकरच अध्यादेश

Guardian Minister Gulabrao Patil in discussion with Industry Minister Uday Samant.
Guardian Minister Gulabrao Patil in discussion with Industry Minister Uday Samant. esakal
Updated on

Jalgaon MIDC News : चिंचोली व कुसंबे (ता. जळगाव) येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) उभारण्यास मान्यता मिळावी, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मंत्रालयात बैठक घेतली.

त्यात जळगाव येथे जळगाव ‘एमआयडीसी’चा वाढता विस्तार पाहता चिंचोली-पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्यास मंत्री सामंत यांनी मंजुरी दिली. (Additional MIDC to Chincholi Pimple Kusumbe jalgaon news)

जळगाव जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला उभारी देणारे महत्त्वाचे विषयही या बैठकीत मार्गी लागले आहेत. याबाबत मंत्री पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अतिरिक्त एमआयडीसी उभारण्यास मान्यता दिल्याने रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत अध्यादेश निघेल.

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारी २०२२ ला झालेली आढावा बैठक व जळगाव उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांनी जळगाव औद्योगिक क्षेत्रालगत नवीन जागा भूसंपादन, चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Gulabrao Patil in discussion with Industry Minister Uday Samant.
Ganeshotsav 2023 : जळगावातही साकारू लागल्या 25 फुटी गणेशमूर्ती! राणा मूर्तिकारांची कमाल

जळगाव औद्योगिक क्षेत्रालगत प्रस्तावित अतिरिक्त जळगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक एक स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडील आढावा बैठकीनुसार कुसंबे खुर्द व चिंचोली येथील प्रस्तावित क्षेत्राची प्रादेशिक अधिकारी, उपरचनाकार, उपअभियंता जळगाव व भूमापक यांच्यामार्फत प्राथमिक स्थळ पाहणी करून आणि पालकमंत्री पाटील यांच्या मागणीनुसार व उद्योगमंत्र्यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी (धुळे) यांनी महाव्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुख्यालय (मुंबई) यांना मौजे कुसंबे खुर्द, चिंचोली येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता.

Guardian Minister Gulabrao Patil in discussion with Industry Minister Uday Samant.
Jalgaon News : जबड्याच्या कर्करोगग्रस्त 102 वर्षीय महिलेची आजारावर मात; जळगावचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. चांडक चमूचे यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com