Jalgaon News : जबड्याच्या कर्करोगग्रस्त 102 वर्षीय महिलेची आजारावर मात; जळगावचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. चांडक चमूचे यश

102-year-old Wahedabi underwent surgery for jaw cancer. Neighbor Dr. Nilesh Chandak, Dr. Shraddha Chandak, Dr. Sagar Vyas, Dr. Rehmatullah Khan (Son).
102-year-old Wahedabi underwent surgery for jaw cancer. Neighbor Dr. Nilesh Chandak, Dr. Shraddha Chandak, Dr. Sagar Vyas, Dr. Rehmatullah Khan (Son). esakal
Updated on

Jalgaon News : येथील चांडक कर्करोग रुग्णालयात १०२ वर्षीय महिलेचा जबडा काढून प्लास्टिक सर्जरीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात चांडक रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक व त्यांच्या चमूला यश आले.

डॉ. चांडक यांनी सांगितले, की बऱ्हाणपूर येथील वाहेदाबी फझलेअजिम (वय १०२) या वृद्ध महिलेला दोन महिन्यांपूर्वी तोंडात गाठ झाल्याचे दिसून आले.

त्यांना त्याचा असह्य त्रास होत होता. ती गाठ तोंडाच्या कर्करोगाची होती. त्यांचे पुत्र डॉक्टर आहेत. (Successful surgery on 102 year woman with jaw cancer jalgaon news)

त्यांनी रुग्ण महिलेला आमच्याकडे तपासणीसाठी आणून गाठ काढण्याविषयी सांगितले. रुग्णानेही गाठ काढण्यास इच्छाशक्ती दाखविली. दरम्यान, त्या महिलेला आमच्याकडे दाखल केले. वाहेदाबी यांचे वय १०२ असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान होते. त्याबाबत त्यांच्या नातेवाइकांना माहिती देत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांचा रक्तदाब, साखर आदी तपासून सर्व योग्य असल्याची खात्री झाल्यावर शस्त्रक्रिया केली.

साडेतीन तास लागले

संबंधित महिलेचा तोंडाचा जबडा काढून प्लास्टिक सर्जरी करण्यास तब्बल साडेतीन तास लागले. डॉ. नीलेश चांडक, डॉ. श्रद्धा चांडक यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डॉ. सागर व्यास यांनीही आव्हान स्वीकारत भूल दिली. शस्त्रक्रियेनंतर एका तासात रुग्ण शुद्धीवर आला. सध्या नळीद्वारे अन्न दिले जात आहे.

शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे रक्ताचा एकही थेंब बाहेर आला नाही. रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. सर्व शस्त्रक्रिया नियोजनानुसारच झाली. आता रुग्ण ठणठणीत आहे. दोन दिवसांत ‘डिस्चार्ज’ दिला जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

102-year-old Wahedabi underwent surgery for jaw cancer. Neighbor Dr. Nilesh Chandak, Dr. Shraddha Chandak, Dr. Sagar Vyas, Dr. Rehmatullah Khan (Son).
Jalgaon News : घरपट्टी माफीचा निर्णय शासन आदेशानंतरच : आयुक्त डॉ. गायकवाड

दुसऱ्यांदा मोठी शस्त्रक्रिया

एक महिन्यापूर्वी १०२ वर्षीय वृद्धेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. चांडक यांनी केली. आता दुसऱ्या १०२ वर्षीय महिलेवर तोंडाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. चांडक यांनी केली आहे.

रुग्णाची ‘गीता’ पाठ

शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्ण महिला वाहेदाबी यांनी ‘भगवद्‌गीता’ म्हटली. ती तोंडपाठ असल्याचे ऐकून मलाही आश्‍चर्य वाटल्याचे डॉ. चांडक यांनी सांगितले.

"डॉ. नीलेश चांडक यांच्याकडे येण्यापूर्वी ‘डॉक्टरांनी तुमच्या आईचे वय झाले आहे. आता शस्त्रक्रिया करू नका’ असे सांगितले. मात्र, डॉ. चांडक यांनी वृद्धेवर शस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्य वाचविले आहे. अतिशय चांगली रुग्णसेवा आम्हाला मिळाली." - डॉ. रेहमातुल्ला खान, रुग्णाचे पुत्र

102-year-old Wahedabi underwent surgery for jaw cancer. Neighbor Dr. Nilesh Chandak, Dr. Shraddha Chandak, Dr. Sagar Vyas, Dr. Rehmatullah Khan (Son).
Ganeshotsav 2023 : जळगावातही साकारू लागल्या 25 फुटी गणेशमूर्ती! राणा मूर्तिकारांची कमाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com