Akshaya Tritiya : सोने ‘दरवाढी’चा विक्रीवर परिणाम; घरे बुकींगला प्रतिसाद

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023esakal

Jalgaon News : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत शनिवारी (ता. २२) अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला. काहींनी सोने खरेदीवर, तर काहींनी नवीन दुचाकी, चारचाकी गाडी घेण्याचा मुहूर्त साधला. (Akshaya Tritiya 2023 Effect of gold price hike on sales jalgaon news)

अक्षय तृतीया हा पितरांचा सण. यादिवशी पितरांच्या नावाने घागर पूजन करून त्यांना पुरणपोळी, आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखविण्यात आला. अनेकांनी सोने, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. सर्वाधिक उलाढाल सोने विक्रीत झाली आहे. सुमारे सात ते आठ किलो सोने विक्री झाल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांचा आहे.

त्यातून सुमारे पस्तीस ते चाळीस कोटींची उलाढाल झाली. सराफ बाजारात सकाळी गर्दी दिसून आली. दुपारी शांतता होती. सायंकाळी सहानंतर पुन्हा विविध शोरूममध्य सोने खरेदीसाठी गर्दी वाढल्याचे चित्र होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये टीव्ही, फ्रिज, मोबाईल, मिक्सर, कुलर, पंखे, एसी, होम थिएटर आदी वस्तूंना मागणी होती. नवीन दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी विविध शोरूममध्येही गर्दी दिसून आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 : संत सखाराम यात्रोत्सवास स्तंभारोपण, ध्वजारोहणाने प्रारंभ

घरे बुकींगला प्रतिसाद

शंखेश्‍वर असोसिएटचे संचालक योगेश खाबीया यांनी सांगितले, की आमचा शिवाजीनगरात राधाक्रिष्ण गृहप्रकल्प साकारला जातोय. पन्नासपेक्षा जास्त सुविधांनी सुसज्ज असा हा प्रकल्प आहे. रेल्वे स्टेशनपासून एक किलोमिटरवर हा प्रकल्प आहे.

त्यात गृहकर्जाची सुविधा आहे. प्रकल्पात राधाक्रिष्ण मंदिर, डिझायनर लॉबी, लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, सीसीटीव्ही कॅमेरा, प्रशस्त पार्कींग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, निसर्गरम्य गार्डन, सुरक्षा रक्षकांसाठी कॅबिन आहे. ग्राहकांचा आमच्या प्रकल्पातील फ्लॅट खरेदीस चांगला प्रतिसाद आहे.

दागीने खरेदी चांगली

नवलखा ज्वेलर्सचे संचालक आदित्य नवलखा यांनी सांगितले, की आमच्याकडे महिलांसाठी अनेक प्रकारच्या शुद्ध सोन्याचे दागिने उपलब्ध आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद सोन्याचे दागीने खरेदीस मिळाला. सर्वच प्रकारच्या दागीन्यांना चांगली मागणी होती.

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 : पिंप्राळ्यात बारागाड्या ओढण्याचा उत्साह...! ‘भवानी माता की जय’चा जयघोष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com