Jalgaon News: पूर नियंत्रणासाठी नागपूरला शासन देणार विशेष पॅकेज : अनिल पाटील

Anil Patil
Anil Patilesakal

Jalgaon News : महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरला भविष्यात कधीही पूरपरिस्थितीचा फटका बसू नये, यासाठी कायमस्वरूपी संरक्षण व पूरनियंत्रणासाठी विशेष पॅकेज देण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे केले. (Anil Patil statement Government to give special package to Nagpur for flood control Jalgaon News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून नागपूरच्या पूरपरिस्थितीवर एकत्रित आराखडा तयार करण्यासाठी ते आले होते.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांमार्फत निधी उभारून नागपूरला अत्यंत अपवादात्मक स्थितीतसुद्धा पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, अशा आधुनिक उपाययोजना करण्याच्या सूचना फडणवीस त्यांनी दिल्या आहेत.

त्यामुळे सर्व विभागाने समन्वय ठेवून एकत्रित सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना त्यांनी बैठकीत केली.

तत्पूर्वी मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी आज सकाळी नागपूर शहरातील विविध भागात भेट देत पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक घेतली.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अॅड. आशिष जायस्वाल, विकास ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी,

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव धारूरकर, संदीप जोशी यांच्यासह जिल्हा प्रशासन, महापालिका व जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळज दूरदृष्य प्रणालीने उपस्थित होते.

Anil Patil
Nashik Weather Forecast: जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’!

मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी मुसळधार पावसामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे स्पष्ट केले.

साडेबारा हजारांवर पंचनामे करण्यात आले असून, आणखी काही पंचनामे बाकी असून ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काही नागरिकांना पैशाची मदत नको असेल तरीही घरातील दस्तावेज व अन्य झालेल्या नुकसानाची नोंद पंचनाम्यात करण्याचे आवाहन केले. सरसकट मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मदत व पुनर्वसन विभागामार्फत काही प्रलंबित मागण्या व निधीची आकडेवारी या वेळी विविध यंत्रणांनी सादर केली. मंत्रालय स्तरावर बैठका लावून यापूर्वीच्या प्रलंबित कामाचा निपटारा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी पीयूष चिवंडे यांनी आभार मानले. बैठकीनंतर आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेले बाळूची उमरेडकर यांच्या कन्या राधिका यांना शासनाकडून चार लाख रुपयांचा धनादेश मदतनिधी म्हणून देण्यात आला.

Anil Patil
Ganesh Visarjan: डोळे भरून आले तुला निरोप देताना! विसर्जनाला नाशिककरांच्या उत्साहाला उधाण; 12 तासांवर मिरवणुका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com