Jalgaon Fraud Crime : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यवसायीकाला गंडवले; १ कोटी लुबाडले

Jalgaon Fraud Crime : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यवसायीकाला गंडवले; १ कोटी लुबाडले

Jalgaon Fraud Crime : बनावट फर्मची खोटी कागदपत्र दाखवित, जास्त मोबदल्याचे अमिष दाखवून चंदूआण्णानगरातील व्यवसायिकाची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तालूका पोलिसांनी नंदू सुदाम बोरसे याला गुजरातमधील भूज येथून अटक केली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


येथील चंदुआण्णानगर- रेणुकानगरात भाऊसाहेब पाटील हे व्यावसायीक वास्तव्याला आहेत. त्यांना नंदू बोरसे व त्यांचा भाऊ दीपक बोरसे यांनी आपल्या फर्मची बनावट (झेरॉक्स) कागदपत्रे दाखवत, या फर्ममध्ये गुंतवणुक केल्यास जास्त रकमेचा नफा (मोबदला) मिळेल, असे अमिष दाखविले होते.

या माध्यमातून दोघा भावांनी पाटील यांच्याकडून तब्बल १ कोटी रुपये लूबाडले. त्यानंतर त्याच पैशांतून पिंप्राळा शिवारात फ्लॅट विकत घेतला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तालूका पेालिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नंदू व दीपक या बोरसे बंधुंविरूद्ध फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Jalgaon Fraud Crime : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यवसायीकाला गंडवले; १ कोटी लुबाडले
Nashik Fraud Doctor : जिल्ह्यात महिनाभरात सापडले चार मुन्नाभाई; बनावट डॉक्टरांविरोधात कारवाईचा बडगा

गुजरातमधुन अटक

पोलिस संशयितांच्या शोधात असताना त्यांना नंदू बोरसे याचा ठिकाणा भुज (गुजरात) येथे असल्याचे समजले. त्यांनी लगेच पथक तयार करुन व भुज येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास नंदू बोरसे याच्या मुसक्या आवळल्या.

त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. त्याचा भाऊ दीपक याच्याबाबत विचारपूस केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २०) संशयिताला जळगाव जिल्हा न्यायालयात उपस्थित केले असता, २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे तपास करीत आहेत.

Jalgaon Fraud Crime : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यवसायीकाला गंडवले; १ कोटी लुबाडले
Nashik Fraud Crime: कमिशनचे आमिष दाखवून एकाला पावणे दोन लाखांना गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com