Jalgaon News : चहार्डीच्या बस वाहकाचा प्रामाणिकपणा; 15 हजाराचे पाकीट केले परत

MSRTC
MSRTCesakal

Jalgaon News : ‘सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, कितीही संकटं येऊ दे पण इमानदार राहू गड्या’ या उक्तीप्रमाणे काही माणसं अशी असतात, की त्यांच्यामुळे त्यांच्या पदाला शोभा येते. एस. टी महामंडळात ‘वाहक’ असणे ही एक साधारण बाब.

परंतु या पदावर काम करताना त्याला न्याय देऊन आपल्या कर्तृत्वाने विशिष्ट उंची गाठणे हे काही प्रत्येकाला शक्य होत नाही. (Chahardi bus conductor honestly returned wallet of 15 thousand jalgaon news)

येथील आगारातील वाहक व चहार्डी (ता. चोपडा) येथील रहिवासी दीपक खैरनार यांनी मात्र आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून ही उंची गाठली आहे.

चहार्डी गावात अतिशय प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्म घेऊन दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर बस वाहकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन दीपक खैरनार हे सध्या येथील बस डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना चोपडा आगाराची बस पुण्याहून परत येण्याची निघाली.

या बसमध्ये रस्त्यात चाकण येथून काही प्रवासी बसले. अनावधानाने बाळासाहेब कर्डिले या प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्येच राहून गेले. त्यांच्या हे लक्षात न येता ते बाभळेश्वर येथे उतरले. काही वेळानंतर गाडी चेक करताना वाहक दीपक खैरनार यांच्या हाती हे पाकीट लागले. त्या पाकिटात १५ हजार रुपये रोख व काही महत्त्वाची कागदपत्रे होती.

MSRTC
Jalgaon News : मंत्री भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

दीपक खैरनार यांनी क्षणाचाही विचार न करता, ते पाकीटातील कागदपत्रांवरुन श्री. कर्डिले यांच्याशी तत्काळ संपर्क केला व त्यांना शिर्डी बस स्थानकात बोलवले. तेथील आगार प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात पूर्ण रक्कम असलेले पाकीट व कागदपत्रे सुपूर्द केली. दीपक खैरनार यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्यासह एस. टी. महामंडळाची प्रतिमा उंचावली आहे.

त्यांना पाकिट सापडल्यानंतर त्यांनी ते ज्यांचे होते, त्यांच्याशी स्वतःहून संपर्क केला. यामुळे या पाकिटाचे मालक असलेले बाळासाहेब कर्डिले वाहक दीपक खैरनार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल भारावले होते. त्यांचे चोपडा आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

MSRTC
Jalgaon News : ‘विनोद पाटील अमर रहे...’च्या घोषणांनी परिसर दणाणला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com