Controversy in market committee elections in  Chalisgaon Jalgaon
Controversy in market committee elections in Chalisgaon Jalgaon esakal

Jalgaon Market Committee Election : मतदान केंद्रावर गोंधळ, चाळीसगावात सौम्य लाठीमार

Jalgaon News : बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात दोन मतदान केंद्रावर गोंधळ झाला. (Controversy in market committee elections in Chalisgaon Jalgaon news)

जळगावात नूतन मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदानावरून अपक्ष उमेदवाराने हरकत घेतल्याने गोंधळ झाला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला, तर चाळीसगाव मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रात गेल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हरकत घेतली, त्यावरून वाद झाला. गोंधळ अधिक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगविली.

जळगाव बाजारसमिती हमाल मापडी मतदार संघातील उमेदवार देवेन सपकाळे यांनी नूतन मराठा केंद्रावर शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याची हरकत घेतली. यावरून मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मतदान रोखण्याची त्यांनी मागणी केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने शांतता झाली.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मतदारांची नावे यादीत आहेत, हरकत घेण्याच्या मुदतीत कोणीही हरकत घेतली नाही, त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे., तरीही रीतसर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते तक्रार करू शकतात. आता मतदान शांततेत सुरू आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Controversy in market committee elections in  Chalisgaon Jalgaon
Jalgaon Covid Vaccination Campaign : जळगावात पुन्हा कोविड लसीकरणाचे अभियान

चाळीसगाव बाजार समिती मतदान केंद्रावर सौम्य लाठीमार

चाळीसगाव बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. चाळीसगाव बाजार समिती निवडणुकीत जिल्हा बँक कार्यालयाजवळ मतदान केंद्रावर महाविकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांत वाद झाल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार मतदान केंद्रात गेल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. त्यांना बाहेर काढा अशी मागणी करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. त्यावेळी एकच गोंधळ उडाला व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप देशमुख हे मतदानासाठी केंद्रात गेले होते. बाजार समिती निवडणुकीत जळगाव येथे नूतन मराठा केंद्रावर सकाळी वाद झाला होता. मात्र इतर ठिकाणी शांततेत मतदान सुरू होते. जळगाव बाजार समितीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांच्या केंद्रावर मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे सांगण्यात आले.

Controversy in market committee elections in  Chalisgaon Jalgaon
Jalgaon Unseasonal Rain : भुसावळ पट्ट्यात वादळी पावसाचे थैमान; जामनेर तालुक्यात गारपीट

जिल्ह्यात ९५ टक्के मतदान

जळगाव जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी ९४.९९ टक्के मतदान झाले. भुसावळ, रावेर, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या सहा समितीची उद्या (ता.२९) रोजी मतमोजणी होणार आहे, तर उर्वरित सहा समितींची रविवार (ता.३०) रोजी मतमोजणी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव, जामनेर, पारोळा, चाळीसगाव, चोपडा, रावेर, भुसावळ या बारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी आज मतदान झाले. जिल्ह्यातील २९,५६९ मतदारांपैकी २७,९२८ मतदारांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला.

बाजार समिती निहाय मतदान असे

बाजार समिती एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी

अमळनेर २४८८ २४४० ९८

जळगाव ३५०५ ३०६८ ८७.५३

पारोळा १७८८ १७४४ ९७.५४

धरणगाव २८९७ २५९६ ८९.६१

रावेर २५६२ २५३६ ९५.६२

Controversy in market committee elections in  Chalisgaon Jalgaon
Government Ordinance : गाळे भाडेपट्ट्यासाठी 3 टक्के आकारणी; शासनाचा अध्यादेश

जामनेर २७९७ २६८८ ९६

यावल २६०४ २४३८ ९३.६३

पाचोरा ३३३८ ३२८८ ९८.२२

चाळीसगाव २३९८ २३७४ ९८.९९

बोदवड २३१५ २१८९ ९४.५५

चोपडा २०२७ २०१५ ९८.४७

भुसावळ ५६० ५५२ ९८.५७

एकूण २९,५६९ २७,९२८ ९४.९९

Controversy in market committee elections in  Chalisgaon Jalgaon
Jalgaon Market Committee Election : 87.53 टक्के मतदान; रविवारी मतमोजणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com