Jalgaon News : गर्दीने फुल बसस्थानक चोरट्यांच्या ताब्यात; पोलिस बसस्थानकात फिरके ना...

Bus Stand Crowd
Bus Stand Crowdesakal

Jalgaon News : रमजान ईद, आखाजी आणि उन्हाळी सुट्यांचा योग जुळून आल्याने बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळत आहे. (crime and stolen cases rise in bus stand in jalgaon crime news)

याच गर्दीचा गैरफायदा घेत भुरटेचोर, गुन्हेगारांनी बसस्थानकासह चालत्या बसवर आपला ताबा मिळवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज एक-दोन गुन्हे घडूनही जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी बसस्थानकावर ड्यूटी असतानाही फिरकत नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांची तक्रार आहे.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मध्यवर्ती नवीन बसस्थानकावर जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नियमित ड्यूटी असते. दिवस-रात्र बसस्थानक भुरटेचोर, पाकीटमारांच्याच ताब्यात असते. दररोज बसस्थानकातून मंगळपोत, पाकीटमारी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे घडत असताना पोलिसदादा बसस्थानकातून गायब आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bus Stand Crowd
Jalgaon Crime News : बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने काकाने हिसकवले

धुळे जिल्ह्यातील राणमाळा येथील विवाहिता कविता जिभाऊ पाटील (वय ३५) या माहेरी बांबरुड येथे जाण्यासाठी सोमवारी सकाळी जळगाव बसस्थानकात आल्या. येथून पाचोरा बसमध्ये चढत असताना यांच्या पर्समधील सोन्याचा नेकलेस व कानातील असे एकूण ३७ हजार रुपयांचे दागिने, साडेचार हजार रुपये असा ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

कविता पाटील यांना पर्समध्ये ठेवलेले दागिने, पैसे सापडत नसल्याने त्यांनी सहप्रवाशांना विचारपूस केली. अखेर परतीचा प्रवास करून त्यांनी जिल्‍हापेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना येथील लीलादेवी जयप्रकाश रुणवाल या वृद्ध महिला सोमवारी (ता. २४) सकाळी नऊच्या सुमारास जालना येथे आपल्या घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील ३० हजारांची पोत लांबविली.

Bus Stand Crowd
Jalgaon Crime News : सुरक्षारक्षकाचा मुलगाच निघाला चोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com