Jalgaon News : रसायनयुक्त पाण्यामुळे पक्षी, कुत्र्यांचा मृत्यू; पारोळा शिवारातील घटना

Red water in the drain due to chemicals and birds floating on the water.
Red water in the drain due to chemicals and birds floating on the water.esakal

Jalgaon News : शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चोरवड रस्त्यावरील शिवल्या नाल्यात अज्ञात व्यक्तीने विषारी रसायनयुक्त पदार्थ टाकल्याने येथील पाणी दूषित झाले. हे पाणी प्यायल्याने काही पक्षी व दोन कुत्री जागीच मृत्युमुखी पडली आहेत.

आज सकाळी नाल्याच्या बाजूला शेतकरी मंगेश पाटील हे आपल्या शेतात गुरांसह आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. (Death of birds dogs due to chemical water in parola jalgaon news)

त्यामुळे त्यांनी पारोळा शहर तलाठी निशिकांत माने यांना याबाबत माहिती दिली. या वेळी पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक सुनील पवार, फौजदार वसावे व गुप्त शाखेचे महेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा घडलेला प्रकार वेस्टेज बांधकामाच्या वॉलपुट्टीच्या थैल्या व काही किराणाचा एक्स्पायर झालेला माल त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्ती टाकून गेल्याने या वस्तू नाल्यातील पाण्यात विरघळल्या. नाल्यातील संपूर्ण पाणी पिवळे, लाल झाले आहे.

त्यामुळे अनेक पक्षी मृत झाले आहेत. एका धनगराच्या चार मेंढ्या पाण्यात उतरल्या असता त्यांची कातडी सोलल्या गेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा प्रकार गंभीर असल्याने पारोळा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकास पाचारण केले. त्यांनी या विषारी वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तसेच मोठा शोषखड्डा करून या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत.

"घडलेला प्रकार गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी या परिसरात आपले पशुधन घेऊन जाऊ नये. तसेच आपले कुठलेही वेस्टेज हे कुठेही न फेकता पालिकेच्या घंटागाडीच्याच ताब्यात द्यावे, जेणेकरून पुन्हा अशी दुर्दैवी घटना निर्माण होणार नाही." - डॉ. उल्हास देवरे, तहसीलदार, पारोळा.

"असे समाजविघातक कृत्य कुणीही करू नये, कारण सार्वजनिक ठिकाणी आपलेही कोणी जवळचे जाऊ शकतात व दुर्घटना घडू शकते. घडलेल्या घटनेचा आम्ही तपास लावू." - सुनील पवार, पोलिस निरीक्षक, पारोळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com