Jalgaon News : विद्यापीठाची सिनेट निवडणूक बेकायदेशीर

Election News
Election Newsesakal
Updated on

जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची सिनेट निवडणूक बेकायदा आहे. नवीन प्राधीकरण अस्तित्वात येण्यास २०२३ उजाडणार आहे. त्यामुळे ही निवडणूक नियमबाह्य असून, ती रद्द करावी, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान सभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की निवडणूक कार्यक्रम मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात सुरू झाला. (Devendra Marathe statement University senate election illegal Demand for annulment of election Jalgaon News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Election News
Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या म्हणजेच अध्यापक गट/ व्यवस्थापन गट यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या प्राधिकरणाचे मतदान ८ जानेवारी २०२३ ला होणार आहे. २७ डिसेंबरला विद्यापीठाच्या पदवीधर गटाची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली व विद्यापीठाच्या या प्राधिकरणाच्या निवडणुकीनंतर विद्यापीठाच्या पदवीधर गटाची निवडणूक घेण्यात येणार आहे.

म्हणजेच विद्यापीठाने संपूर्ण विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम हा तब्बल सहा महिने विलंबाने सुरू केला. कारण, नवीन विद्यापीठ प्राधिकरण अस्तित्वात येण्यासाठी मार्च २०२३ उगवेल. त्यामुळेच ही संपूर्ण विद्यापीठाची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर आहे. ही निवडणूक प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. ज्या नियमानुसार नागपूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक नागपूर खंडपीठाने रद्द केली, तोच नियम व तोच संदर्भ कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठालाही लागू पडतो. हिवाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेऊन जळगाव विद्यापीठाची बेकायदेशीर सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया तत्काळ थांबवावी व कायद्यानुसार पुढे निवडणूक प्रक्रिया राबवावी.

Election News
SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur dcc bank
UP Gangster Act Invoked: Maharashtra Seizes ₹100 Crore Worth of Properties
solapur
Satara Shock: Police Raid Uncovers Illegal Explosives Cache Near Residential Area
30 English Keywords
Marathi News Esakal
www.esakal.com