Latest Marathi News | रेशन दुकानात तपासणीत आढळली तफावत; 3 संशयितांसह गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : रेशन दुकानात तपासणीत आढळली तफावत; 3 संशयितांसह गुन्हा दाखल

अमळनेर : मारवड येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आल्याने झालेल्या तपासणीत धान्यसाठ्यामध्ये तफावत आढळून आली. या प्रकरणी दुकानाचा सेल्समन, वाहन चालक व मारवड येथील एका व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारवड येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १०५, १०६ मधून सोमवारी (ता. २६) रात्री वाहन (जीजे ०५, सीव्ही ४८२९) मधून शासकीय तांदळाच्या आठ गोण्या घेऊन जात असताना गावातील नागरिकांनी रंगेहाथ पकडून महसूल अधिकाऱ्यांना बोलावले होते. (Discrepancies found in inspection at ration shops case has been registered with 3 suspects jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon News : Thirty First वरील नियंत्रणासाठी 2 पथके

त्यावेळी सेल्समन अनिल काशिनाथ पाटील कुलूप लावून निघून गेला तर वाहनचालक प्रशांत विजय पाटील (रा. जैतपिर) याने सांगितले, की मला दिनेश वडर (रा. मारवड) याने माल घेऊन जाण्याबाबत सांगितले होते. त्यावरून दोन्ही दुकाने २६ ला रात्रीच सील करण्यात आली होती.

सील केलेली दोन्ही दुकाने २७ ला सकाळी नायब तहसीलदार संतोष बावणे यांनी ‘सील’ उघडून पंचनामा केला असता दिवाळी काळात वाटपसाठी असलेली साखर २ क्विंटल, डाळ १ क्विंटल व किरकोळ तेल आणि रवा असा माल शिल्लक होता तर अंत्योदय, प्राधान्य योजनेतील धान्य पुस्तकाप्रमाणे अपेक्षित गहू साठा ८५.१३ क्विंटल हवा असताना प्रत्यक्ष ८४ क्विंटल म्हणजे १.१३ क्विंटल कमी आढळून आला तर तांदूळ साठा १२५.२३ क्विंटल अपेक्षित असताना तो १४१.३० क्विंटल म्हणजे १६.०७ क्विंटल जादा आढळून आला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Dhule News : पांझरा पात्रातून वाळूची तस्करी; महसूल विभागाची डोळेझाक

याचा अर्थ ग्राहकांना वाटप करण्यात आला नाही. तसेच दुकानात लाभार्थी याद्या, किरकोळ विक्रीदर फलक नाही , दक्षता समिती सदस्य नावे आढळून आली नाही. म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आदेश दिल्यानुसार संतोष बावणे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात अनिल पाटील, प्रशांत पाटील, दिनेश वडर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik News : इंधन टँकरची रस्त्यावर पार्किंग! अपघाताचा धोका, कंपनीचे पोलिसांकडे बोट

टॅग्स :JalgaoncrimericeWheat