Nashik : रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेतांना पकडले; मुद्देमाल ताब्यात

Due to vigilance of villagers issue of ration grain shop solved
Due to vigilance of villagers issue of ration grain shop solvedesakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानात वाटप करून शिल्लक राहिलेल्या धान्याचे ३२ कट्टे काळ्या बाजारात विक्रीसाठी मंगळवार ( ता.३० रोजी ) चालले असतांनाची कुणकुण ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी सतर्कतेने मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. (Caught black market grain from ration shops Possession of material Latest Nashik News)

Due to vigilance of villagers issue of ration grain shop solved
‘MVP’मध्ये 20 वर्षांनंतर ‘परिवर्तन’

स्वस्त धान्य दुकान नं १११ चे दुकानदार बाळासाहेब रामजी मते यांनी अर्धवट धान्य वाटप करून उरलेले धान्याने भरलेले पोते रिकामे करून प्लास्टिक गोणीत भरुन उरलेला माल वाटप न करता काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असतांना याची कुणकुण ग्रामस्थांना लागली असता ग्रामस्थांनी ते स्वतः पकडले.

इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दखल घेऊन पुरवठा विभागाचे पथक घटनास्थळी पाठवुन कारवाई सुरु केली आहे. तसेच या गंभीर प्रकारणाची वाडीव-हे पोलिसांनी दखल घेतली आहे.मुरंबी गडगडसांगवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रतन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बेंडकुळी, माजी पोलीस पाटील दत्तु पुंजाजी शिंदे, दिलीप शिंदे, खंडू बेंडकोळी, सुकदेव शिंदे, नथु भोई, समाधान भोई, बालाजी तळपाडे, पंडीत शिंदे, नवनाथ शिंदे, प्रभाकर शिंदे, संदीप शिंदे, काळु वाघ, हनुमंता वाघ, गजीराम बेंडकुळी, अशोक शेंडे, रामदास पाटील शिंदे, मंगलाबाई पाडेकरं, चंदाबाई बेंडकोळी, ठकुबाई पुरकुले, हिराबाई पाडेकर, सुन्याबाई पाडेकर, चंदाबाई मोर आदी ग्रामस्थांनी ही मोहीम फत्ते करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत तहसील अधिकाऱ्यांकडून व पुरवठा विभागाकडुन पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.

Due to vigilance of villagers issue of ration grain shop solved
कळवणच्या लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com