घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
lpg gas cylinder
lpg gas cylinder esakal

जळगाव : आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र लक्ष्मण पवार (रा. तेजस पार्क, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथील तरुण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांनी सोमवारी (ता. १६) कारवाई करुन २ घरगुती गॅस सिलिंडरसह गॅस भरण्याचे मशिन असा २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सुशील पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन मच्छिंद्र पवार याला अटक केली आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.

lpg gas cylinder
जळगाव : लाचखोर मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात
lpg gas cylinder
जळगाव : तांबापुरा दंगलीत पोलिसांवर उलटला जमाव; वेगवेगळे गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com