Jalgaon News : भुसावळच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्र्वास; मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे जमिनदोस्त

Employees of the team removing encroachment in front of the court premises. Provincial officer Jitendra Patil and municipal employees were present during the operation.
Employees of the team removing encroachment in front of the court premises. Provincial officer Jitendra Patil and municipal employees were present during the operation.esakal
Updated on

Jalgaon News : शहरात पालिकेच्या पथकाकडून तापी नदीपासून यावल रोड, जामनेर रस्ता, कोर्ट परिसर, नहाटा चौफुलीवरील सर्व अतिक्रमण दोन जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टर यांच्या साह्याने काढण्यात आले.

यासाठी पन्नास अधिकारी कर्मचारी, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तसेच पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे कारवाईच्या ठिकाणी तळ ठोकून होते. गेल्या बारा वर्षांपासून गटारी अतिक्रमण धारकांना बुजून दुकाने लावलेली जागा सुद्धा जेसीबी मशीनच्या साह्याने मोकळी करण्यात आली.

शहरातील लोकसंख्या दोन लाखांवर आहे. रस्ते नेहमी गर्दीने फुललेले असतात. सायंकाळी वाहतुकीचा बोजारा होतो. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाबाबत प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या. (Encroachment on main roads of city jalgaon news)

नगरपालिकेतर्फे आवाहनही करण्यात आले होते. परंतु अतिक्रमणधारकांकडून कुठलाच प्रतिसाद नसल्याने अखेर ही अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात आली. कोर्ट परिसरात बाहेरील बाजूने रस्त्यावर वाहने तासन् तास लावण्यात येत असल्याने वाहतुकीची बऱ्याच प्रमाणात कोंडी होते. रहदारीस अडथळा निर्माण होतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालिकेची थकबाकी

अतिक्रमणादरम्यान नगरपालिकेची आठ ते दहा कोटी थकबाकी आहे. चालू वर्षांची ३३ टक्के थकबाकी असल्याने जे मुख्य थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे एक लाखाच्या वर रक्कम वर आहे, अशी काही अतिक्रमण काढत असताना ‘सील’ केली आहे. अतिक्रमण काढण्याने स्वच्छतेचा प्रश्न देखील मिटणार आहे. अवैध बांधकाम तसेच नळ कनेक्शन यांचा सर्वांचा विचार करून अतिक्रमण काढण्यात आले.

तसेच वारंवार सूचना न देता या वेळेचा फायदा घेत मुख्याधिकाऱ्यांनी गाळेधारकांना थकबाकी न देणाऱ्यांची दुकाने ‘सील’ केली. इतर गाळेधारकांना थकबाकी असल्यास त्वरित भरणा करण्याच्या मुख्याधिकारी यांनी सूचनाही दिल्या. तसेच तार ऑफिस रोडवरील काही बेकायदेशीर बांधकामे जेसीबीने जमिनदोस्त केली.

Employees of the team removing encroachment in front of the court premises. Provincial officer Jitendra Patil and municipal employees were present during the operation.
Jalgaon News : हतनूर जलाशयावर वाटसरू पक्ष्यांचा अभ्यास; प्रथमच आढळला जाड चोचीचा ‘वटवट्या’

पुढाऱ्यांकडून अतिक्रमणधारकांची दिशाभूल करण्यात आली आहे. दिवाळीनंतर अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्वासने देणाऱ्या पुढाऱ्यांनी अखेर आपली तोंडे लपविण्यातच भलाई असल्याची भूमिका अवलंबिली. प्रशासन हे कायदेशीर बाजू तपासूनच अतिक्रमण काढतात. या दरम्यान वादाचे किरकोळ प्रसंग उदभवले होते, ते शांततेत मिटविण्यात आले आहेत.

अतिक्रमण हे कायमचे काढण्यात आले आहे. दररोज स्वतः उपविभागीय अधिकारी संपूर्ण शहरात फिरणार आहे. त्याचप्रमाणे शाळा, कॉलेज परिसरातील विमल गुटखा, अंमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाई सुद्धा करणार आहे.जेणे करून तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. अनावश्यक गाड्यांचा वापर करू नये, एखादे किलोमीटर पायी जाण्यास प्राधान्य द्यावे. अतिक्रमणधारकांना प्रशासन तसेच नगरपालिकेतर्फे एखाद्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून गाळे बांधून भाडे करारावर देण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून भाडे व कर मिळेल. लवकरच नागरिकांच्या समोर प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

चहाच्या दुकानाला ‘सील’

नहाटा महाविद्यालयाच्या जागेमध्ये पक्के बांधकाम केलेल्या चहा विक्रेत्याला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी स्वतः जाऊन हॉटेलचालकाकडे परवान्याची मागणी केली. मात्र दुकानातील कर्मचाऱ्याने हे दुकान अग्रवाल नामक व्यक्तीचे असल्याचे सांगितले. त्याच्याकडून मागणी केलेले कुठलेही कागदपत्र न मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना सांगून दुकाने ‘सील’ करण्यास सांगितले.

Employees of the team removing encroachment in front of the court premises. Provincial officer Jitendra Patil and municipal employees were present during the operation.
Jalgaon News : ..तर संपूर्ण 7 किलोमीटरचा महामार्गच खोदावा लागेल! चौपदरी मार्गाची वर्षातच चाळण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com