Jalgaon Crime News : एरंडोलला मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : येथील ब्राह्मण ओटा विठ्ठल मंदिराजवळ (Jalgaon News) असलेल्या महादेव मंदिराची शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. (Erandol temple vandalised by unknown persons jalgaon crime news)

याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, समाजकंटकांना पोलिसांनी शोधून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (ता. ९) सायंकाळी चारला हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिस निरीक्षक संतीष गोराडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे उपनिरीक्षक शरद बागल यांनी संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.

दरम्यान,शहरातील वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले होते. मात्र पोलिसांनी स्थिती गांभीर्याने हाताळत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले व शांतता प्रस्थापित केली. मंदिराच्या समोरच महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेण्यास मदत होईल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime news
Jalgaon Crime News : गुदामावर छाप्यात जनावरांची कातडी जप्त

याबाबत प्रसाद दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाचे करण्यात आले आहे. तसेच शहरात अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध व गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

crime news
Jalgaon Crime News : कुत्र्याला घाबरवणाऱ्याला चौघांनी बदडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com