New Year 2024 : जळगावमध्ये किरकोळ वाद वगळता ‘थर्टी फर्स्ट’ शांततेत; प्रवचन-आरतीने स्वागत

पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून नाकाबंदीसह कारवाईला सुरवात केल्याने यंदाचा ‘थर्टी फर्स्ट’ मोठे हॉटेल आणि शेतातील पार्टी वगळता शहरामध्ये शांततेत साजरा झाला. बिअर बार चालकांना पहाटे पाचची परवानगी उपयोगी पडली नाही.
Devotees present for midnight aarti.
Devotees present for midnight aarti.esakal

New Year 2024 : पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून नाकाबंदीसह कारवाईला सुरवात केल्याने यंदाचा ‘थर्टी फर्स्ट’ मोठे हॉटेल आणि शेतातील पार्टी वगळता शहरामध्ये शांततेत साजरा झाला. बिअर बार चालकांना पहाटे पाचची परवानगी उपयोगी पडली नाही.

हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा पोलिस कारवाईमुळे नेहमीपेक्षा कमी ग्राहक असल्याने हिरमोड झाला.(Except for minor disputes in Jalgaon Thirty First was peaceful new year 2024 jalgaon news)

पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध असणाऱ्यांचा दरवर्षी इतका विरोध यंदा प्रकर्षाने दिसला नाही. धार्मिक संघटनांकडून आठवडाभरापासून विरोध सुरु व्हायचा. ‘थर्टी फर्स्ट’चा त्रास अधिक वाढण्याची भीती सामान्यांना होती. मात्र, उलटे झाले. पोलिस कारवाईच्या भीतीने विरोध करणारे आणि ‘थर्टी फर्स्ट’चा धांगडधिंगा घालणारे तरुण रस्त्यांवर फिरकले नाहीत. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केल्याचा हा परिणाम होता.

दहा हजाराच्या दंडाची भीती

नवीन वाहतूक अध्यादेशानुसार मद्य पिवून वाहन चालविणाऱ्या चालकावर दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेने रात्री आठ ते पहाटेपर्यंत १९ केसेस केल्या असून ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह’ मध्ये मद्यपी चालकांना एक लाख ९० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई तीन दिवसांपासून सुरु असल्याने मद्य पिवून गाडी चालविणाऱ्यांनी शहराबाहेर सोय करणे पसंत केल्याचे आढळले.

श्रीमंतांचे ‘स्टॅण्डर्ड मेन्टेन’

श्रीमंत कुटुंबातील तरुण आणि जोडप्यांनी शहरातील मोठ्या ‘थ्री-स्टार’ हॉटेलमध्ये ‘बुकिंग’ केले होते. शहरातील मोजक्या हॉटेलमध्ये ऑक्रेस्ट्रासाठी तरुण जोडपी दिसून आली. रात्री वाहने घेऊन रस्त्यावर यायचे नाही, म्हणून बहुतांश हॉटेलमध्ये विश्रांती आणि स्वतंत्र खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ‘थर्टी फर्स्ट’साठी ऑक्रेस्ट्राची व्यवस्था केलेल्या हॉटेल चालकांनी परवानगी घेऊन खासगी बाऊन्सर उपलब्ध करून घेतले होते.

Devotees present for midnight aarti.
New Year 2024: फ्लाईंग किस अन्... थलायवानं केलं चाहत्यांचं न्यू इयर हॅप्पी! रजनीकांतचा व्हिडिओ व्हायरल

‘स्ट्रीट फूड’ विक्रेत्यांचा हिरमोड

राज्य सरकारने बिअर बार चालकांना पहाटे पाचपर्यंत मुभा दिली होती. मात्र, रस्त्यावर हातगाड्या, छोटे दुकानदार, पावभाजी, अंडापावसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जिल्‍हा पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून ताकीद देत रात्री साडेनऊ ते दहापर्यंत बंद करण्यास सांगितले होते. परिणामी, अशा विक्रेत्यांचा कच्चा माल तसाच पडून राहिला. एरवी होणाऱ्या विक्रीपेक्षा कमी विक्री ‘थर्टी फर्स्ट’ला झाल्याने ‘स्ट्रीट फूड’ विक्रेत्यांचा हिरमोड झाला.

पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण नको, मद्य पिवून कुणी धिंगाणा घालू नये, यासाठी शहरातील बहुतांश हनुमान मंदिरांमध्ये रात्रीच्या आरतीसह प्रवचन झाले. सिंधी कॉलनीतील धार्मिक स्थळामध्ये पहाटेपर्यंत सहकुटुंब प्रवचनासाठी सिंधी बांधवांची गर्दी झाली होती.

दगडफेकीसह गोंधळ

जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पद्मालय विश्रामगृह जवळील एका हॉटेल बाहेर रात्री अकराला आठ ते दहा तरुणांच्या टोळक्याने एकास हॉटेलमधून ओढून मारहाण केली. शाहुनगर पोलिसलाइन समोरील एका बिअर बार मधील व्यवस्थापकाला पाच रुपयांवरून वाद घालून मारहाण करीत गंभीर जखमी करण्यात आले. भीतीने हॉटेल बंद केल्याने रात्री साडेबाराला हॉटेलवर काही तरुणांनी दगडफेक करत गोंधळ घातला.

Devotees present for midnight aarti.
New Year 2024: संकल्पांची पेरणी करत नववर्षाचे स्वागत! हॉटेल्समध्ये तोबा गर्दी; गच्चीवर एकत्र येत पार्टीला पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com