Jalgaon News : त्या’ गृहस्थाचा मृतदेह घेण्यास कुटूंबीयांचा नकार

Milind Pawar
Milind Pawaresakal

Jalgaon News : शहर महापालिकेसमोरील दुभाजकावर दुचाकी आदळून वीज डीपीचे लिव्हर हॅण्डल मानेत शिरल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मंगळवारी (ता. २०) मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण कळताच कुटुंब व नातेवाइकांनी संताप व्यक्त करत रात्रीच पोलिस ठाणे गाठले.

बुधवारी (ता. २१) सकाळी वीज कंपनीवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा शाहूनगरवासीयांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वस्त केल्यावर वाद निवळला.(family refuses to take dead body of gentleman Crowd of residents of Shahoonar at police station Demand to file a case against electricity company Jalgaon News)

शाहूनगरातील रहिवासी मिलिंद सोमनाथ पवार (वय ४६, रा. शाहूनगर) यांचा मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास दुचाकी (एमएच १९, सीपी ९९४६) विद्युत डीपीचा लिव्हर मानेत शिरल्याने जागीच मृत्यू झाला होता.

अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी रात्री जिल्‍हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला. घटनेचे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिल्यावर कुटुंब व नातेवाइक घटनास्थळी धडकले.

पाहणी केल्यावर तो लिव्हरही आढळून आला, तर यापूर्वी असाच अपघात होऊन एका गृहस्थाचा जीव गेल्याचीही माहिती मिळाल्याने नातेवाईक व शाहूनगरवासीय कमालीचे संतापले. तत्काळ त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठत वीज कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Milind Pawar
Jalgaon News : कर्मचारी भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करा; राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

मृतदेह घेण्यास नकार

बुधवारी सकाळी जिल्‍हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तत्पूर्वी कुटुंब, नातेवाईक आणि शाहूनगरवासीयांनी वीज कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अगोदर गुन्हा दाखल करा.

नंतरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा घेत पुन्हा पोलिस ठाणे गाठले. निरीक्षक विलास शेंडे यांनी जमाव व कुटुंबीयांची समजूत काढली. लेखी तक्रारी घेत आश्वस्त केल्यावर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला व अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Milind Pawar
Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांकडून जलतरण तलावाची पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com