Latest Marathi News | शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Jalgaon News : शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मेहुणबारे : धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी शिवाजी लक्ष्मण चव्हाण (वय ५०) यांनी शेतातील कापूस ठेवलेल्या पत्री शेडच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

शिवाजी चव्हाण पत्नी, दोन मुले व सुना नातवंडांसह धामणगावात राहतात. बुधवारी (ता. २८) सकाळी सव्वासातच्या सुमारास शिवाजी चव्हाण यांनी त्यांच्या मालकीच्या नवेगाव भागातील शेतात कापूस ठेवलेल्या पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये छताच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Farmer committed suicide by hanging himself jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Dhule News : पांझरा पात्रातून वाळूची तस्करी; महसूल विभागाची डोळेझाक

ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवाजी चव्हाण यांचा मृतदेह खाली उतरवला. ही आत्महत्या पहाटे सव्वासातपूर्वी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबत धामणगावचे पोलिसपाटील हेमंत निकम यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा: Jalgaon News : Thirty First वरील नियंत्रणासाठी 2 पथके