Jalgaon News : तळईच्या वीरमरणप्राप्त जवानाला अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कारगिल येथील मीडियम रेजिमेंट तोफखान्यात कार्यरत असलेले तळई येथील भूमिपुत्र नितीन तुळशीराम पाटील (वय ४२) हे शुक्रवारी (ता. २२) सकाळी नऊला वीरमरण प्राप्त झाले.
Officers and personnel of the Army and Police forces paying their last respects to martyred soldier Nitin Patil.
Officers and personnel of the Army and Police forces paying their last respects to martyred soldier Nitin Patil.esakal

Jalgaon News : कारगिल येथील मीडियम रेजिमेंट तोफखान्यात कार्यरत असलेले तळई येथील भूमिपुत्र नितीन तुळशीराम पाटील (वय ४२) हे शुक्रवारी (ता. २२) सकाळी नऊला वीरमरण प्राप्त झाले.

त्यांच्यावर देवळाली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचे पार्थिव शनिवारी (ता. २३) सकाळी तळई येथे आणण्यात आले. (final farewell to martyred jawans of Talai jalgaon news)

शासकीय इतमामात सकाळी दहाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरमरणप्राप्त नितीन पाटील यांच्या पार्थिवाला त्यांची मुलगी समृद्धी पाटील व काव्या पाटील यांनी मुखाग्नी दिला. या वेळी ‘वीर जवान अमर रहे...’ अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

वीरमरण प्राप्त जवान नितीन तुळशीराम पाटील हे कारगिल येथे मीडियम रेजिमेंट तोफखाना विभागात कार्यरत होते. दरम्यान, ते देवळाली मिलिटरी हॉस्पिटलला उपचार घेत होते. मात्र, शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव देवळाली येथून शनिवारी सकाळी त्यांचे मूळ गाव तळई येथे आणण्यात आले.

या वेळी महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. येथील तरुणांकडून पाचशे मीटर भारतीय तिरंगा ध्वज राहत्या घरापासून अंत्यविधीसाठीच्या नियोजित जागेपर्यंत झळकविला. या वेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फैरी झाडून मानवंदना

अंत्यविधीसाठी युनिट २८६ मीडियम रेजिमेंट कारगिल गनर्सबरोबर नायब सुभेदार मुलानी रहीम, बीएचएम चंद्रशेखर काळे, हवालदार विनोद पाटील, स्टेशन हेडक्वार्टर भुसावळतर्फे हवालदार महेशकुमार, नायक भूषण पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगावचे नितीन पाटील, रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे या अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली, तसेच पोलिस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

Officers and personnel of the Army and Police forces paying their last respects to martyred soldier Nitin Patil.
Jalgaon News : समांतर रस्त्यासाठी 40 कोटी मंजूर : सुरेश भोळे

या वेळी एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडल अधिकारी प्रमोद गायधनी, कासोदा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे, तसेच खानदेश ग्रुप आजी-माजी सैनिक, एरंडोल यांच्यातर्फे शासकीय इतमामात जवान नितीन पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

...यांची होती उपस्थिती

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा परिषदेचे सदस्य नाना महाजन, तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, आनंदराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शिवसेनेचे रवींद्र चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तळईचे सरपंच भाईदास मोरे, उपसरपंच प्रभाकर पाटील, तळई माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष रमाकांत रोकडे, उपाध्यक्ष बबनराव पाटील, सचिव नरेंद्र पाटील, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह माजी सैनिक, गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावावर शोककळा

नितीन पाटील हे २००३ पासून ‘युनिट २८६ मीडियम रेजिमेंट’मध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच गावावर संकटाचा जणू पहाडच कोसळला होता. ते अत्यंत सुसभावी, मनमिळावू, तसेच गावात आल्यावर तरुणांना नेहमी सैन्यभरतीबाबत मार्गदर्शन करीत असत.

Officers and personnel of the Army and Police forces paying their last respects to martyred soldier Nitin Patil.
Jalgaon News : समांतर रस्त्यासाठी 40 कोटी मंजूर : सुरेश भोळे

किंबहुना, शारीरिक व बौद्धिक चाचणी देताना कुठली पुस्तके वाचली पाहिजेत, याचेही मार्गदर्शन येथील तरुणांना करीत असत. वेळप्रसंगी गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक स्वरूपात मदतही करीत असत. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

कुटुंबीयांचे अश्रू अनावर

कुटुंबातील आई शांताबाई तुळशीराम पाटील, पत्नी शीतल नितीन पाटील, मुलगी समृद्धी नितीन पाटील, तसेच मोठे बंधू नीलेश तुळशीराम पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. जवान पाटील यांच्या आई, पत्नी, मुलगी व मोठे बंधू यांनी हंबरडा फोडला.

Officers and personnel of the Army and Police forces paying their last respects to martyred soldier Nitin Patil.
Jalgaon News : देशातील अराजकतेविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश : प्रतिभा शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com