Food Fraud : अस्सल तूप अखाद्य म्हणूनही विकल्याचा संशय : एम. राजकुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghee

Food Fraud : अस्सल तूप अखाद्य म्हणूनही विकल्याचा संशय : एम. राजकुमार

जळगाव : जिल्‍हा दूध उत्पादक संघातील अखाद्य तूप (बी-ग्रेड) चॉकलेट फॅक्टरीत विक्री केल्या प्रकरणात आज पोलिस पथक अकोल्यात धडकले. संशयित रवी अग्रवाल यांच्या फॅक्टरीसह घरात पथकाने तपासणी केली असून नमुने संकलित करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा दूध संघातील महागडे अस्सल तूप ग्रेड कमी दाखवून तर..विकले गेलेले नाही ना याचाही पोलिस छडा लावणार असल्याचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.

हेही वाचा: Shraddha Murder Case: रिलेशनशिपमध्ये तुम्ही तर या चुका करत नाही ना? श्रद्धाच्या याच चुकांनी...

जिल्‍हा दूध उत्पादक संघातील लोणी, तूप आणि दूध भुकटीत झालेल्या अपहाराप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आजवर सहा संशयितांना तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. सर्व संशयितांना शनिवार (ता.१९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेतील प्रत्येकाची जबाबदारी आणि गुन्ह्यातील सहभाग यावर तपास पथके काम करत आहे. अटकेतील संशयितांच्या अधिकारात झालेल्या गुन्ह्यात सहभागी कर्मचाऱ्यांसह इतरही अधिकारी रडारवर आले असून या प्रकरणात करता करविता धनी कोण? याचा उलगडा तपासाचा एकेक धागा जोडल्यानंतरच होणार आहे. दूधसंघातील तूप अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकाच्या विठ्ठल रुक्मिणी एजन्सीमार्फत अकोला येथील राजेमलाई या चॉकलेट फॅक्टरीचे संचालक रवी अग्रवाल यांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले असून आहे. तपासात साहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र पाटील यांचे पथक संशयित रवी अग्रवाल याला घेऊन अकोल्यात धडकले.

हेही वाचा: Nerolac Paints : पेंट कंपनीने गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये भरला श्रीमंतीचा रंग

काय घडले अकोल्यात

तपास पथकाने या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाला लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली. संबंधित चॉकलेट कारखान्यावर छापा टाकल्यानंतर पथकाने तयार चॉकलेट, रॉ मटेरीयल आणि दूध संघातून पुरवठा होणाऱ्या तुपाचे नमुने संकलित केले आहेत. अग्रवाल यांच्या घरातून महत्त्वाचे दस्तऐवजांसह बँकेचे व्यवहार आणि ट्रान्झॅक्शन असलेल्या नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Sachin Waze : सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण...

भंगारवाल्याचा कबुली जबाब

दूधसंघातून ज्या पंधरा लीटरच्या डब्यातून अखाद्य तुपाचा पुरवठा करण्यात येत होता. त्या डब्यातून तूप काढल्यावर खाली डबे भंगारवाल्यास विक्री करण्यात आल्याचे संशयिताने सांगितल्यावर रवी अग्रवाल याला घेऊन पथक भंगारवाल्याच्या गोदामावर धडकले. त्याने ते डबे भंगारमध्ये विल्हेवाट लावल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

''दूध संघाच्या दाखल गुन्ह्यात मूळ फिर्यादीत नमूद तथ्य तपासण्यात येत आहे. घडल्या प्रकारात बी-ग्रेडचे तूप चॉकलेट कंपनीला विक्री झाल्याचे निष्पन्न झाले असून संशयितांनी अपहार करण्यासाठी अस्सल तूप बी-ग्रेडचे करून तर, विकले नाही याचा तपास केला जात आहे. त्याचबरोबर खाण्यास अयोग्य-अखाद्य तुपाची विक्रीच्या नोंदी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाला याबाबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे. जो कुणी दाखल गुन्ह्यात सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होणारच.'' - एम. राजकुमार, जिल्‍हा पोलिस अधीक्षक, जळगाव.

हेही वाचा: Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती