Jalgaon News : Credit Card चे Limit वाढवायचे सांगत फसवणुक; तरुणाच्या खात्यातून 35 हजार लंपास

crime news fraud
crime news fraud esakal

Jalgaon News : शिरसोली (ता. जळगाव) येथील व्यवसायिक तरुणाच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून सायबर भामट्यांनी चक्क ३४ हजार६८० रुपयांचा चुना लावला. शिरसेाली येथील बी. एस. सोनार यांच्या मोबाईलवर दुपारी चारला अज्ञात भामट्याचा फोन आला.

त्याने मराठीत संभाषण करून आम्ही बँकेतून बोलत असून, क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्याचे सांगून सोनार यांच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठविला. (Fraud by asking to increase Credit Card Limit 35 thousand lumps from youth account Jalgaon Crime News)

आलेला ओटीपी सांगितल्यावर बँक खात्यातून काही क्षणातच ३४ हजार ५८० रुपये परस्पर डेबीट झाल्याचे निदर्शनास आले.

याबाबत सोनार यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर तज्ज्ञांनी पे-टीएमवरून होणारा हा व्यवहार थांबविण्याबाबत संबंधित कंपनीला सूचित केले. सोनार यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news fraud
Jalgaon News : रस्त्यावरील उघड्या धोकादायक DP पावसाळ्यात ठरणार घातक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com