solar energy
solar energysakal

Jalgaon News: भुसावळात सौरऊर्जेवरील ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणार

सात वर्षांच्या कालावधीत हे नाविन्यपूर्ण, खडतर आणि आव्हानात्मक काम असल्याने आगामी २०२४ आणि २०२५ या वर्षांत महानिर्मितीला अनेक आघाड्यांवर रणनीती आखून अतिशय नियोजनबद्ध अधिक जोमाने काम करावे लागणार आहे.

"महानिर्मितीने व्हिजन-२०३० अन्वये आगामी सात वर्षांत एकूण स्थापित क्षमता २५ हजार मेगावॉट (२५ गिगावाट) पेक्षा अधिक करण्याचा निर्धार केला असून त्यात सुमारे ८ हजार मेगावॉट स्थापित क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला आहे. एकूणच औष्णिक विद्युत उत्पादनाकडून नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करीत पर्यावरणपूरक वीज उत्पादनाकडे आगामी काळात महानिर्मितीचा विशेष कल राहणार आहे."

- अभय हरणे, संचालक (प्रकल्प), महानिर्मिती

(Green hydrogen project on solar energy will be set up in Bhusawal Jalgaon News)

सात वर्षांच्या कालावधीत हे नाविन्यपूर्ण, खडतर आणि आव्हानात्मक काम असल्याने आगामी २०२४ आणि २०२५ या वर्षांत महानिर्मितीला अनेक आघाड्यांवर रणनीती आखून अतिशय नियोजनबद्ध अधिक जोमाने काम करावे लागणार आहे.

यामध्ये मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, नैसर्गिक साधनांची उपलब्धता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, दस्तावेज ,कायदेशीर बाबी, अटी व शर्थी, जमीन अधिग्रहण यासारखी कामे करून प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी करावी लागणार आहे हे विशेष.

solar energy
Nashik News: ‘सही रे सही’ची नोंद गीनिज बूकमध्ये व्हावी : नितीन गडकरी

त्यामुळे २०२४ च्या संकल्पात प्रामुख्याने ६६० मेगावॉट क्षमतेचा भुसावळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवून त्यातून वाणिज्यिक तत्वावर वीज उत्पादन सुरू करणे, कोराडी येथे २x६६० मेगावॉट क्षमतेच्या अत्याधुनिक औष्णिक विद्युत बदली प्रकल्पाची प्राथमिक कामे पूर्ण करून प्रकल्प कामे सुरू करणे,

सौरऊर्जेवर आधारित महानिर्मितीचा भुसावळ येथे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित करणे, ६६२ मेगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामांना गती देणे, महानिर्मितीच्या २३ संचांसाठी फ्ल्यू गॅस डी सल्फरायझेशन संयंत्र उभारणी करून त्या कामांना गती देणे, मेसर्स एस.जे.व्ही.एन. , महाऊर्जा, राहुरी कृषी विद्यापीठ यांचे समवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार पुढील कार्यवाही करणे,

इरइ धरणावर १०५ मेगावाट तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच वेकोलीच्या खाणीतून थेट पाईप कन्व्हेयर प्रणालीद्वारे कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राना कोळसा वहन करणे आणि चंद्रपूर शहरात ४५ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, महानिर्मिती प्रकल्प नियोजन चमू यासाठी सज्ज आहे.

solar energy
Dhule News: धुळे मनपाच्या प्रशासक दगडे-पाटील! मालमत्ता करावरील शास्तीमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com