Dhule News: धुळे मनपाच्या प्रशासक दगडे-पाटील! मालमत्ता करावरील शास्तीमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन

धुळे महापालिकेतील भाजपचा सत्ताकाळ शनिवारी (ता. ३०) संपुष्टात आला.
Administrator Amita Dagde-Patil during a meeting in the Municipal Corporation
Administrator Amita Dagde-Patil during a meeting in the Municipal Corporationesakal

धुळे : येथील महापालिकेतील भाजपचा सत्ताकाळ शनिवारी (ता. ३०) संपुष्टात आला. त्यामुळे आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी प्रशासकाची सूत्रे स्वीकारली.

त्यांनी यंत्रणेची बैठक घेत नागरिकांना मालमत्ता करावरील शास्तीमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. (Dhule Municipality Administrator Dagde Patil Invoking availment of Penalty on Property Tax News)

आयुक्‍त तथा प्रशासक दगडे-पाटील यांनी रविवारी (ता. ३१) महापालिकेच्या प्रशासकपदाचा कार्यभार हाती घेतला. त्या संदर्भात विभागप्रमुखांची सकाळी अकराला बैठक घेतली.

शासन निर्देशानुसार महापालिकेची पंचवार्षिक मुदत ३० डिसेंबरला संपल्याने पुढील कालावधीसाठी प्रशासकपदी मनपा आयुक्‍त दगडे- पाटील यांची नियुक्‍ती झाली. त्यानुसार त्यांनी सूत्रे स्वीकारत बैठक घेतली.

शास्तीमाफीचा निर्णय

शहरासह हद्दवाढीतील मालमत्तांसाठी अधिनियमातील तरतुदीनुसार ९ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ अखेर मालमत्ता करावरील शास्तीमाफीचा निर्णय जाहीर झालेला आहे.

नागरिकांनी आपल्या थकबाकीसह मालमत्ता कराचा भरणा करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासकांनी केले.

Administrator Amita Dagde-Patil during a meeting in the Municipal Corporation
Nashik News: जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विक्रमी प्रस्ताव दाखल : संदीप पाटील

तसेच प्रशासकीय कालावधीत पारदर्शकतेने व समन्वयाने कामकाज करण्याचा मानस आयुक्‍त तथा प्रशासक दगडे-पाटील यांनी व्यक्‍त केला. त्या संदर्भात पुढील कामकाजाबद्दल आवश्यक ते आदेश सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिले.

यंत्रणा उपस्थित

कर मूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट, नगरसचिव मनोज वाघ, उपमुख्य लेखापरीक्षक सुनील सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, आस्थापना विभागप्रमुख संजय मोरे, एलबीटीप्रमुख किशोर सुडके, सहाय्यक अभियंता सी. एम. उगले, प्रदीप चव्हाण, कनिष्ठ अभियंता कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, भांडारपाल राजेंद्र माईनकर, वाहन विभागप्रमुख सुडके, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, विकास साळवे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

Administrator Amita Dagde-Patil during a meeting in the Municipal Corporation
Nashik News: ‘सही रे सही’ची नोंद गीनिज बूकमध्ये व्हावी : नितीन गडकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com