Nashik News: ‘सही रे सही’ची नोंद गीनिज बूकमध्ये व्हावी : नितीन गडकरी

भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सही रे सही’ या नाटकाचा ४४०० वा प्रयोग नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात रसिकांच्या अलोट गर्दीत झाला
Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal

नाशिक : ‘सही रे सही’ नाटकाचे हजारो प्रयोग व्हावेत आणि ‘गीनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या नाटकाची खास नोंद व्हावी, असे गौरवोद्‌गार केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सही रे सही’ या नाटकाचा ४४०० वा प्रयोग नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात रसिकांच्या अलोट गर्दीत झाला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. (Nitin Gadkari statement Sahi Re Sahi drama should be recorded in Guinness Book Nashik News)

महाराष्ट्रातील दर्दी आणि चोखंदळ रसिकांमुळेच नाटक, लोककला, लावणी, तमाशा, संगीत आदी कला आजही टिकून आहेत.

या कला यापुढेही अशाच टिकून राहाव्यात, असे वाटत असेल तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह उभारावे आणि किमान एक हजार रुपये भाड्याने ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

खर्चात बचत व्हावी, असे वाटत असेल तर नाट्यनिर्मात्यांनी डिझेल अथवा पेट्रोलवर चालणाऱ्या बसऐवजी इलेक्ट्रिकल बसची कास धरणे गरजेचे आहे, असेही केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरी म्हणाले.

कार्यसम्राट आणि हास्यसम्राट एकाच मांचावर एकत्र आले, हा एक प्रकारे दुग्धशर्करा योगच आहे, असे जयंत जातेगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. एकेकाळी प्रभाकर पणशीकर हे गावोगावी फिरून नाट्यकलेचा प्रचार आणि प्रसार करीत असत.

आज ‘सही रे सही’ या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव यांचे नावसुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे, असे श्री. जातेगावकर म्हणाले.

या नाटकाचा प्रयोग सोमवारी (ता.१) रात्री साडेनऊला जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिर येथे, तसेच २ जानेवारीला रात्री साडेनऊला कालिदास कलामंदिर, नाशिक येथे होत आहे.

Nitin Gadkari
Jalgaon: ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी साडेपाच कोटींचा निधी; मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट

भरत जाधव यांनी केले ना. गडकरींच्या कार्याचे कौतुक

पूर्वी आम्ही एक नाटक झाल्यानंतर दुसरा नाटकाचा प्रयोग असेल तर त्यासाठी अडीचशे किलोमीटरपर्यंतचे अंतर निश्चित करायचो. कारण तेथे पोहोचण्यास भरपूर वेळ लागायचा.

परंतु ना. गडकरी यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर रस्त्यांचे व्यापक जाळे विणल्याने आता आम्ही दुसरा प्रयोग पाचशे ते सातशे किलोमीटरपर्यंत असेल तरी त्यासाठी जाऊ शकतो.

कारण तेथे पोहोचणे चांगल्या रस्त्यांमुळे सहज शक्य होते. ना. गडकरी यांनी ही किमया करून दाखविल्यामुळे केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगभरातील सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत भरत जाधव यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले.

Nitin Gadkari
Nashik News: जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विक्रमी प्रस्ताव दाखल : संदीप पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com