Gulabrao Patil News : पक्ष सांभाळायचा बोध राऊतांनी पवारांकडून घ्यावा; गुलाबराव पाटलांचा टोला

Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal

Gulabrao Patil News : ‘राष्ट्रवादी’कॉंग्रेसमध्ये एकमेकांविरूद्ध सभा घेणं सुरू आहे, तरीही राष्ट्रवादी एकसंघ असल्याचे चित्र निर्माण केलं जात आहे.

पक्ष कसा सांभाळायचे हे संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडे शिकून बोध घ्यावा, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. (gulabrao patil statement about sanjay raut on political party jalgaon news)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी अजित पवार हे आमचे नेते आहेत, असे वक्तव्य केले आहे. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले कि, नेतेपदाची ‘राष्ट्रवादी’ कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे.

कोण कोणाचे नेते आहेत, हे पक्षानेच ठरवायचं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये असलेले एकमेक सर्व आपलेच असल्याचे म्हणत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gulabrao Patil
Sharad Pawar Video : ''झाली का सभा?'' आजारी बहिणीने शरद पवारांना विचारलं; भाऊ-बहिणीच्या नात्याचा व्हिडीओ

तर दुसरीकडे त्यांचे एकमेकांविरूद्ध सभा घेणेही सुरू आहे. दोन्ही नेत्यांचे वक्तव्य पाहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व एकजुटीने चालले आहे, तसेच हे सर्व समजुतीने काम झालेले आहे, असा शिक्कामोर्तब जनतेमधून होतांना दिसत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटलेला नाही, तर तो एकसंघ आहे असे चित्र सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण केलं जातयं. पक्षात फुट पडलेली असल्यास पक्ष कसा सांभाळायचा याचा बोध संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडून घ्यावा असा टोलाही त्यांनी लगावला.

Gulabrao Patil
Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा 'गनिमी कावा'; संजय राऊतांचा मोठा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com