Jalgaon : बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याला अटक

arrested Vinayak Meshram
arrested Vinayak Meshramesakal

जळगाव : अवैधरीत्या देशीविदेशी दारूची (Liquor) विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सुप्रिम कॉलनीतून अटक (Arrested) केली आहे. त्याच्याजवळून सुमारे २१ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Illegal liquor seller arrested Jalgaon Crime News)

arrested Vinayak Meshram
जळगाव : मोबाईल दुरुस्तीने दिले शेकडो हातांना काम

जळगाव अजिंठा रोडवरील सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास असलेला विनायक देवेश्वर मेश्राम हा सुप्रिम कॉलनी परिसरातच नाथकृपा कॉम्प्लेक्स येथे देशी विदेशी दारूची बेकायदा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या पथकातील अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, योगेश सपकाळे, मिलिंद सोनवणे, सचिन पाटील, सुधीर सावळे अशांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास छापा टाकून संशयित आरोपी विनायक देवेश्वर मेश्राम (वय ३८, रा. महादेव मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी) याला रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून देशीविदेशी दारूचा माल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात सशंयिताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

arrested Vinayak Meshram
Jalgaon : बंगाली कारागिराकडून ‘भंगाळे गोल्ड’ची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com