Sakal Exclusive : 12 महिन्यांत ‘अबतक छब्बीस’ एमपीडीए; प्रतिबंधात्मक कारवाईच शस्त्र

Sakal Exclusive : 12 महिन्यांत ‘अबतक छब्बीस’ एमपीडीए; प्रतिबंधात्मक कारवाईच शस्त्र
esakal

Sakal Exclusive : वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी जिल्‍हा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा सपाटाच लावला असून, वर्षभरात तब्बल २६ गुन्हेगारांना स्थानबद्ध करून दोन गँग मोक्का कायद्यांतर्गत कारागृहात डांबल्या गेल्या आहेत, तर यादीवरील अनेक गुन्हेगार हद्दपार आहेत.

जवळपास ३८ लाख लोकसंख्यच्या आणि १५ तालुक्यांच्या जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे जनसामान्यांसह पोलिस विभागही प्रभावित झाला आहे. एनसीआरबी (नॅशनल क्राइम ब्युरो) नुसार नैसर्गिकरीत्या वर्षाला केवळ पाच टक्के गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असते.

मात्र, जळगाव जिल्‍हा याला अपवाद आहे. घात-अपघात, चाकूहल्ले, खुनाच्या घटनांसह स्त्री-बालिका अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. (in 12 month 26 mpda act action jalgaon news)

गुन्हे वाढत असताना जिल्‍हा पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्षभरात दीड हजारावर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना दत्तक योजनेत नामांकित करवून घेण्यात आले.

दत्तक योजनेसाठी पोलिस ठाणेनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक बिट अंमलदार त्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची अचानक तपासणी करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असतो.

तीन-चार गंभीर गुन्हे आणि प्रतिबंधकात्मक कारवाई करूनही गुन्हेगाराच्या वागणुकीत फरक न पडल्यास किंवा गुन्ह्यांमधील सातत्य कायम राहिल्यास अशा सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येते. हद्दपार करून नंतर ‘एमपीडीए’सारख्या प्रभावी कारवाईचा अंमल सध्या पोलिस दलातर्फे सुरू असून, वर्षभरात २६ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

"दहा वर्षांत गुन्हेगारी बदलली असून, पारंपरिक पद्धतीच्या ‘थर्ड-डिग्री’चा वचक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. कायद्याच्या लवचिकतेमुळे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे कागदाची काठी अन्‌ कायद्याच्या तलवारीनेच उपचार करावे लागणार आहेत.

गुन्हा घडल्यावर त्यावर काम करण्यापेक्षा गुन्हा करणारे सराईत पोलिसांचे टार्गेट आहेत. चॅप्टर, हद्दपारी, एमपीडीए, मोकाअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांची जेलरवानगी केल्याने जनसामान्यांना दिलासा मिळतो." - किशन नजन पाटील वरिष्ठ निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal Exclusive : 12 महिन्यांत ‘अबतक छब्बीस’ एमपीडीए; प्रतिबंधात्मक कारवाईच शस्त्र
Jalgaon Raid News : वाहनांच्या ताफ्यासह 40 अधिकाऱ्यांचा फौजफाटा; समन्स, वॉरंटसह सर्व तयारीची सज्जता

अशी आहे यादी

स्थानबद्ध गुन्हेगार : राहुल बऱ्हाटे (३३, रा. मेहरूण), राजेश ऊर्फ दादू निकुंभ-भोई (२०, अमळनेर), शुभम ऊर्फ दाऊद देशमुख (२४, अमळनेर), निखिल ऊर्फ भोला कसबे (२१, चाळीसगाव), मुकेश भालेराव (२३, भुसावळ), विशाल सोनवणे (२७, अमळनेर), समीर काकर (२०, तांबापुरा), जितेंद्र ऊर्फ मोनू कोल्हे (३४, भुसावळ), रितेश ऊर्फ चिचा शिंदे (२१, रामेश्वर कॉलनी), रिजवान ऊर्फ काल्या शेख (२२, तांबापुरा), वाजीद खान (२३, चाळीसगाव), वैभव ऊर्फ टकल्या गवळी (३०, चोपडा), शेख शाहरुख शेख हसन (२६, रावेर), संदीप ऊर्फ डॉन निकम (२४, गेंदालाल मिल), रणजितसिंग जुन्नी (२८, राजीव गांधीनगर), काजल ऊर्फ रफिक शेख रशीद (३७, अमळनेर), किरण खर्चे (३०, सुप्रीम कॉलनी), प्रकाश कंजर (३४, खंडेरावनगर), जिभाऊ गायकवाड (३४, दापोरा), सोनू पांडे (२८, भुसावळ), ज्ञानेश्वर तायडे (३२, कोळन्हावी), निखिल ऊर्फ पिया कुडे (२४, चाळीसगाव, वाळूमाफिया), शेख चांद शेख हमीद (३८, भुसावळ), विशाल कोही (२४) विशाल चौधरी (२७, अमळनेर), हसनअली ऊर्फ आशू नियाज अली इराणी (२४, भुसावळ) यांचा समावेश असून, तब्बल पाच ‘एमपीडीए’चे प्रस्ताव रांगेत आहेत.

Sakal Exclusive : 12 महिन्यांत ‘अबतक छब्बीस’ एमपीडीए; प्रतिबंधात्मक कारवाईच शस्त्र
Sakal Exclusive : नाशिक जिल्ह्यात 8 लाख 60 हजार 258 निरक्षरांची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com