Jalgaon Accident News : चाळीसगावजवळ डंपर-पीकअपच्या अपघातात 4 मजूर ठार

Jalgaon Accident : रेल्वे लाइनचे काम करून घराकडे परतणाऱ्या मजुरांच्या डंपर आणि समोरुन येणाऱ्या पीकअप यांच्यात जोरदार धडक झाली.
Accident
Accident esakal

Jalgaon Accident News : रेल्वे लाइनचे काम करून घराकडे परतणाऱ्या मजुरांच्या डंपर आणि समोरुन येणाऱ्या पीकअप यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात चार ते पाच मजूर ठार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास हिरापूर (ता. चाळीसगाव) गावाजवळ घडला. रात्रीची वेळ असल्याने अपघातात नेमके किती दगावले व किती मजूर जखमी झाले, याची माहिती मिळू शकली नाही. (Jalgaon 4 labourers killed in dumper and pik up accident near Chalisgaon)

सध्या रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचे काम सुरू आहे. तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे परतत होते. त्याचवेळी चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणारी पीकअप गाडी समोरून येत होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता, की डंपर जागेवरच उलटला. त्यामुळे डंपरमधील काही मजूर फेकले गेले, तर काही डंपरखाली दाबले गेले. अपघातात एका महिलेसह एक जागीच ठार झाल्याचे घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्यांनी सांगितले. (latest marathi news)

Accident
Jalgaon Accident News : चारचाकी वाहनाची रिक्षाला धडक; 5 प्रवासी जखमी

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव, कजगाव येथून रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी वैद्यकीय सूत्रांनी दोघांचाच मृत्यू झाल्याचे सांगितले.

सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Accident
Nagpur Accident News : विचित्र अपघातात पाच वाहनांना धडक; अजनी चौकातील अपघात पाच जण गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com