Jalgaon News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाची मुलगी जखमी; मोकाट कुत्र्यामुळे नागरिक त्रस्त

Jalgaon : चार वर्षाची मुलगी घराच्या जवळ खेळत असतांना भटक्या कुत्र्यांनी ओढत नेऊन तिचे लचके तोडले.
stray dog ​​attack
stray dog ​​attackesakal

Jalgaon News : चार वर्षाची मुलगी घराच्या जवळ खेळत असतांना भटक्या कुत्र्यांनी ओढत नेऊन तिचे लचके तोडले. शेचारच्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मुलीला सोडवून जिल्हा रूग्णलयात दाखल केले. शहरातील शिवाजीनगर भागातील धनाजी काळे नगरात सायंकाळी हा प्रकार घडला. मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात अनेक भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. (Jalgaon 4 year old girl injured in stray dog ​​attack)

शिवाजी नगर भागात या मोकाट कुत्र्यामुळे लहान मुलांना अक्षरश: भितीदायक झाले आहे. शिवाजी नगरातील धनाजी काळे नगरात एक चार वर्षाची लहान मुलगी आपल्या घराजवळ खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी अक्षरक्ष: तिला घराजवळून फटफटत नेले तीन कुत्र्यांनी तीच्या हल्ला चढवित लचके तोडले.

शेजारच्या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेवून या कुत्र्यांच्या तावडीतून या मुलीला सोडविले. मात्र, मुलगी गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तातडीने तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कुत्र्यांचा अनेकांना चावा

काळेनगरातील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही या भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत अनेक वेळा महापालिकेला निवेदन दिले. (latest marathi news)

stray dog ​​attack
Jalgaon Gulabrao Patil : शिंदे गटात स्टार प्रचारकपदी पालकमंत्री गुलाबराव पाटील

परंतु, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यामुळे एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे. जर महापालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

"धनाजी काळेनगरात मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून चार वर्षाची मुलगी बचावली. परंतु, ती गंभीर जखमी आहे. या भागात कुत्रे चावल्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत निवेदन देवूनही ते लक्ष देत नाहीत. जर वेळीच उपाय केले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल."- विजय बांदल, शिवसेना विभागप्रमुख, शिवाजीनगर

stray dog ​​attack
Jalgaon News : वरणगाव पालिका कार्यालयाचे स्थलांतर! लवकरच नवीन इमारतीतून चालणार कारभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com