Jalgaon Fraud Crime : कर्जदाराचा 5 वित्तीय कंपन्यांना 8 कोटींचा ‘चुना’

Jalgaon Fraud Crime : खोटे घोषणापत्र सादर करून कर्जदाराने मालमत्तेची विक्री करीत मध्य प्रदेशातील पाच कंपन्यांची आठ कोटी १६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal

Jalgaon Fraud Crime : खोटे घोषणापत्र सादर करून कर्जदाराने मालमत्तेची विक्री करीत मध्य प्रदेशातील पाच कंपन्यांची आठ कोटी १६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात कर्जदाराशी संगनमत केल्याच्या आरोपावरून सह. दुय्यम निबंधक, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह १२ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदूर (मध्य प्रदेश) येथील वित्तपुरवठा करणाऱ्या पाच खासगी कंपन्यांकडून नशिराबाद येथील काझी सय्यद अहमदअली व अमतुल लतीफ काझी (दोघेही रा. काझीवाडा, नशिराबाद) यांनी त्यांच्या पेट्रोलपंपासाठी तब्बल १९ प्रकारचे कर्ज घेतले. (borrower has defrauded 5 companies of Rs. 8 crore)

त्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे इंदूर न्यायालयात त्यांच्या विरोधात दावे दाखल होते. लोकअदालतमध्ये न्यायालयाने आदेश देऊन कर्जदारांना ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत कर्जाची परतफेड करण्याचे आदेश दिले होते.

परंतु त्यांनी परतफेड न केल्यामुळे इंदूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कर्जदार नशिराबाद येथील असल्याने ही याचिका जळगाव न्यायालयात वर्ग करण्यात आली. कर्जाची मूळ रक्कम दोन कोटी दहा लाख रुपये होती. मात्र त्यावर आतापर्यंत व्याज व इतर शुल्क मिळून ही रक्कम आठ कोटी १६ लाख ३० हजार ३५६ एवढी वसूल करायची आहे.

अशी ही बनवाबनवी...

दरम्यान, वसुलीला बगल देण्यासाठी कर्जदारांनी सह. दुय्यम निबंधक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून संगनमताने जप्त मालमत्तेचे वेगवेगळे हिस्से, खोटे घोषणापत्र व शपथपत्राच्या आधारे मालमत्तेची विक्री केली. व्यवहाराचे मूल्य कमी दाखवले.

मिळकती अब्दुल रशीद अब्दुल हमीद देशमुख, सुवेद अब्दुल रशीद देशमुख (दोघही रा. देशमुख वाडा, पाचोरा) व यशवंत खंडू बारी (रा. गणपतीनगर, जळगाव), फकीर शरीफ भिकन शहा (रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा) यांना विकल्याचा आरोप आहे.

Fraud Crime
Jalgaon News : मालेगावच्या सैफ अलीने गाजविला आखाडा

महसुली अधिकाऱ्यावर गुन्हा

कर्जदारांशी संगनमताच्या आरोपावरून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वित्त कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र, ९० दिवसांत कुठलेही उत्तर न मिळाल्याने तक्रारदार वित्त कंपनीचे संचालक अमित अग्रवाल यांच्या तक्रारीवरून कर्जदार काझी सय्यद अहमद अली.

अमतुल लतीफ काझी, काझी सय्यद बशीरअली (तिघेही रा. नशिराबाद), सह. दुय्यम निबंधक संजय ठाकरे, गजानन दगडू पिंगळे, संजय पुंडलिक नाईक, नशिराबाद तलाठी रूपेश अनिल ठाकूर, नशिराबाद मंडळ अधिकारी आशिष रामचंद्र वाघ तसेच खरेदी करणारे फकीर शरीफ भिकन शहा (रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा)

यशवंत खंडू बारी (रा. गणपतीनगर), सुवेद अब्दुल रशीद देशमुख, अब्दुल रशीद अब्दुल हमीद देशमुख (दोघेही रा. देशमुख वाडा, पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. निरीक्षक अनिल भवारी तपास करीत आहेत.

Fraud Crime
Jalgaon News : अमळनेरला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com