Jalgaon Crime News : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट

Jalgaon Crime : शहरातील गणपतीनगरात वास्तव्यास असलेल्या विवाहिता पतीला न सांगताच बहिणीसोबत दवाखान्यात गेल्याचा राग आल्याने पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : शहरातील गणपतीनगरात वास्तव्यास असलेल्या विवाहिता पतीला न सांगताच बहिणीसोबत दवाखान्यात गेल्याचा राग आल्याने पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. संतप्त पतीसह त्याचा भाऊ, पुतण्या अशांनी तेथे जाऊन सासरच्या मंडळींना मारहाण करून वयोवृद्ध सासूच्या डोक्यात वीट घातल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. रामानंदनगर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime)

गणपतीनगर पिंप्राळा येथे रूपाली विकास चव्हाण (वय ३१) या पती विकास चव्हाण, मुलगा कृष्णा आणि कार्तिक यांच्यासह राहतात. ब्यूटिपार्लर चालवून कुटुंबीयांना त्या हातभार लावतात. मंगळवारी (ता. २६) तब्येत बरी नसल्याने रूपाली यांनी त्यांची बहीण आशा यांना बोलावून घेत तिच्यासोबत दवाखान्यात गेल्या.

इकडे पती घरी आल्याने त्याने आपल्याला न सांगता दवाखान्यात का गेली म्हणून पत्नीला मारहाण केली. रागाच्या भरात रूपाली घर सोडून पिंप्राळा येथे बहिणीकडे निघून गेल्याने संतप्त पती विकास, जेठ बबन, पुतण्या विनोद अशांनी रूपालीच्या बहिणीच्या घरी जात मारहाण करण्यास सुरवात केली. (latest marathi news)

Crime
Crime News: धक्कादायक! अल्पवयीन बहिणीवर भावांनीच केला सामूहिक अत्याचार, टेरेसवरुन दिलं फेकून अन्..

बचाव करताना बहीण आशा व पाहुणे योगेश यांनाही बेदम मारहाण केली. त्यावेळी रूपाली यांच्या आई इंदूबाई यांनी मध्यस्थी केली असता पती विकास चव्हाण याने त्यांच्या डोक्यात वीट घातली. त्या रक्तबंबाळ झाल्याने विकासने पळ काढला.

जखमी इंदूबाई यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. जखमी इंदूबाई व मुलगी रूपाली यांचा जबाब नोंदवून घेत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Mumbai Crime: परीक्षेत प्रश्‍नांची उत्तरे न दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांनी केला चाकूहल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com