Jalgaon News: गाव, सोसायटीला, नगरांना सुवर्ण, रौप्य, कांस्य फलक! मतदारवाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा अभिनव उपक्रम

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
After voting, such boards will be seen in villages, societies, towns.
After voting, such boards will be seen in villages, societies, towns. esakal

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदानाच्या टक्केवारीवर त्या गावाला, नागरी भागातील सोसायटी, नगर, अशा नागरी समुहांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक लावले जाणार आहेत. (Jalgaon Collector Ayush Prasad innovative initiative to increase voters marathi news)

मतदान टक्का वाढविण्यासाठी नागरी सहभाग महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येकाला ‘आपले गाव’, ‘आपली सोसायटी’, ‘आपले नगर’ याचा नावलौकिक व्हावा असे वाटते. त्यासाठी मतदार सहभागाचा हा उपक्रम आगळावेगळा ठरणार आहे.

कसा असेल हा उपक्रम

नागरिकांनी मतदानाबद्दल अधिक सजग, जागृत होऊन मतदान करावे. मतदान करणे ही लोकशाहीतली अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे, ही गोष्ट रूढ होण्यासाठी असे उपक्रम फलदायी ठरतील, म्हणून ज्या वसाहती, गृहनिर्माण संस्था आणि गावे ७६ ते ८५ टक्के मतदान करतील,

त्यांना कांस्य रंगाचे फलक त्यांना अभिमानाचे प्रतीक वाटावेत, अशा ठिकाणी उभे केले जातील, तर जिथे ८६ ते ९५ टक्के मतदान होईल, अशा वसाहती, गृहनिर्माण संस्था, आणि गावात रौप्य फलक लावला जाईल आणि जिथे ९६ ते १०० टक्के मतदान होईल, अशा ठिकाणी चक्क सुवर्ण फलक लावला जाईल.  (latest marathi news)

After voting, such boards will be seen in villages, societies, towns.
Nashik News : सिमेंट बंधारा फुटल्याने पाणीटंचाईचा प्रश्न; दारणानदी पात्रातील दौंडत-मानिखांब सिमेंट बंधाऱ्याची स्थिती

या उपक्रमाचा प्रभाव वाढविण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने रोटरी क्लब, निवासी कल्याण संघटना, स्थानिक संस्थांसह विविध सामाजिक गटांकडून पाठिंबा मिळविला आहे. लोकशाही मूल्यवृद्धी करण्याच्या या भावनेला चालना देण्यासाठी आणि मतदानासाठी सामाजिक दबाव निर्माण करण्यासाठी ‘मी मतदान केले, आम्ही सर्वांनी मतदान केले’, या घोषवाक्याखाली वॉकथॉनसारख्या समाज बांधणी उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.

"समूहाचा बहुमान होत असेल, तर मतदानवाढीसाठी सामूहिक प्रयत्न होऊ शकतात, ही या संकल्पनेचा गाभा आहे. या उपक्रमाला विविध सामाजिक संघटना, सामाजिक कामात अग्रेसर असणारे व्यक्तींनी पुढे येऊन मतदानवाढीसाठी प्रयत्न करावेत."

-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

After voting, such boards will be seen in villages, societies, towns.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : चहा-नाश्ता, जेवणासह हार, शालीचा दर निश्चित! अर्ज भरल्यापासून द्यावा लागणार हिशेब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com