Jalgaon News : निसर्ग अन् बालविश्र्वाचे अंतरंग उलगडणाऱ्या लेखिका केटी बागली

Jalgaon : जळगाव येथील पर्यावरण जनजागृतीचे कार्य करणाऱ्या ‘समर्पण’ या संस्थेतर्फे पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. शहरात उद्या (२५ फेब्रुवारी) तिसरे पर्यावरण साहित्य संमेलन होत आहे.
Katie Bagli
Katie Bagliesakal

Jalgaon News : जळगाव येथील पर्यावरण जनजागृतीचे कार्य करणाऱ्या ‘समर्पण’ या संस्थेतर्फे पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. शहरात उद्या (२५ फेब्रुवारी) तिसरे पर्यावरण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पर्यावरण आणि बाल साहित्यिक श्रीमती केटी बागली भूषवित आहेत. या संमेलनानिमित्त हा विशेष लेख... - अर्चना उजागरे, जळगाव

साहित्य हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. बालपणापासूनच साहित्य गोष्टी गाणीरूपाने आपल्या आयुष्यात प्रवेश होतो. (Jalgaon Katie Bagli writer who explores nature and childhood)

अगदीच बालपणी ऐकलेल्या या कथा मूल वाचू लागले की अधिक ठळकपणे त्याच्या मनावर परिणाम करतात. मुलांचे भावविश्व हे बालसाहित्य वाचनातून अधिक समृद्ध होते. आज आपणा सर्वांचे बालपण गिरीजाकीर, सानेगुरुजी, दुर्गा भागवत, प्र. के. अत्रे, शांत शळके अशा मराठी तर लेविस कॅरोल, मार्क ट्वेन सारख्या परकीय साहित्यिकांमुळे समृद्ध झाले आहे.

आमच्या पिढीचे बालपण निसर्गावर आधारित सुंदर पुस्तकांमुळे अधिक समृद्ध झाले आहे. अशा लेखकांमध्ये रस्कीन बॉंडच्या कथा आजही आवडीने वाचल्या जातात. अशाच निसर्ग आणि बाल साहित्यिकांमध्ये अग्रणी नाव म्हणजे श्रीमती केटी बागली.

निसर्गावर आधारीत कथा, गोष्टी, गाणी यांचे लिखाण करून त्याद्वारे मुलांना निसर्ग अधिक सोप्या रितीने समजवून सांगण्याचे कार्य केटी बागली चांगल्या रितीने करीत आहेत. आपल्या लेखनाद्वारे मुलांना निसर्गाचे महत्त्व, मानवी जीवनात असणारे निसर्गाचे योगदान समपर्कपणे देण्याचे कार्य त्या करीत आहेत.

आज आपणा सर्वांच्या भवताली असणाऱ्या कृमी कीटकांनाही आपल्या कथेत स्थान देणारी ही लेखिका आपल्या सहज सुंदर भाषेने सर्व बालवाचकांना आपलेसे करते. केटी बागली यांनी आपले सर्व लिखाण इंग्रजी भाषेतून केले आहे. पण सोपे शब्द सुलभ रचना यामुळे आज त्यांचे लिखाण बालकांबरोबरच कुमारवयीन मुलांमध्येही लोकप्रिय आहे.

Katie Bagli
Jalgaon News : एरंडोल मतदारसंघात 17 कोटी शेत, पाणंद रस्त्यांसाठी मंजूर

व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या केटी यांचा जवळजवळ २० ते २५ वर्षांपूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी त्या निसर्ग संवर्धन कार्यक्रमाच्या संस्थेशी संपर्क झाला. संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने त्यांना निसर्ग, पशु, पक्षी यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली.

ही माहिती लोकांमध्ये पोचविण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केले. आज नव्या पिढीला जर आपण निसर्ग संवर्धनाबद्दल जागरूक केले तर भविष्यात हीच पिढी निसर्ग रक्षणाचे कार्य अधिक तन्मयतेने करेल हे जाणून केटी बागली यांनी लहान मुलांसाठी गोष्टी, गाणी लिहणे सुरु केले.

आणि वाचकांना निसर्गसाहित्याचे सुंदर असे दालनच उपलब्ध झाले. केटींची पुस्तके वाचली तर अनेक नवीन गोष्टींचा उलगडा होतो. ‘स्टोरीज ऑफ ट्रीज फ्रॉम इंडिया’ हे त्यांचे पुस्तक आपण वाचले तर वडाच्या झाडाला फुले का नसतात? काही वृक्षांना पावसाळी झाडे का म्हटले जाते.

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास सविस्तरपणे मिळतात. ज्यायोगे मुलांची उत्सुकता अधिक विस्तारीत होते आणि त्यांना या गोष्टींद्वारे भेटणारी झाडे म्हणजे आपले मित्रच वाटू लागतात. तर ‘झू अराऊंड यू’ या काव्यसंग्रहामध्ये आपणास आपल्या घरात तसेच सभोवताली आढळणारे कृमी -कीटक, पक्षी, उंदिर, घुशी बेडके यांसारखे प्राणी कवितेद्वारे भेटायला येतात.

Katie Bagli
Jalgaon News : मालेगावच्या सैफ अलीने गाजविला आखाडा

आज सिमेंटच्या आपल्या या शहरांमध्ये आढळणारे हे नैसर्गिक घटक मुलांना अधिक परिचयाचे होतात. तर ‘फ्लाइट ऑफ द पिंक’ मध्ये नामषेश झालेले पिंक हेडेड डक आपणास भेटते. आपल्या वनांमध्ये, पर्वतांवर असलेल्या रानांमधील वृक्षांचे महत्त्व किती आहे, हे यांना आपणास ‘सांगला’ सारख्या गोष्टीद्वारे विदित केले आहे.

याच पुस्तकात आपणास चार वर्षांची गोंडस मुलगी ‘तारा’ भेटते जी मुंबई सारख्या महानगरात राहूनही हिमालयातील देवदार वृक्षांची प्रगतीच्या नावाखाली होणारी कत्तल थांबविण्याचे धाडस दाखविते. अशी जवळपास ३३ पुस्तके केटी बागली यांनी लिहिली आहेत.

त्यांची पुस्तके आज शाळांमध्ये तसेच प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी आणि संशोधानासाठी उपयोगी पडत आहेत. तसेच मुंबई शहरात रिडिंग ओंलिपियाडसाठीही त्यांची पुस्तके नामांकीत करण्यात आली आहेत. त्यांच्या लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

Katie Bagli
Jalgaon News : अमळनेरला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com