Jalgaon News : आधारकार्ड अपडेट अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय; विवीध शैक्षणिक कामात येतोय अडथळा

Jalgaon News : आधारकार्डावरील अंगठ्याचे ठसे अपडेट होत नसल्याने आधार नूतनीकरण रद्द होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय सुरु आहे.
Aadhaar card
Aadhaar card esakal

रावेर : विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेट होत नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक फॉर्म भरताना अडथळा निर्माण होत असून वारंवार आधार नूतनीकरण करूनही यु.आई डी.ए आई. कडून आधार कार्डाशी संलग्न शैक्षणिक अर्ज भरले जात नाही. आधारकार्डावरील अंगठ्याचे ठसे अपडेट होत नसल्याने आधार नूतनीकरण रद्द होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय सुरु आहे. (Jalgaon Lack of Aadhaar card update inconvenience students)

शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड हे अनिवार्य आहे. ज्यामध्ये आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईलवर ओ.टी.पी द्वारे पुढील शैक्षणिक कामे पुढे वाढतात. पण सध्या विद्यार्थ्यांचा आधारचे नूतनीकरण होत नाही. मोबाईल नंबर आधारशी जोडले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना वारंवार आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मोठी समस्या

रावेर तालुक्यातील अनेक विद्यार्थी ज्यांचे वय १५ ते २० वर्ष आहे त्यांचे आधार नूतनीकरण मध्ये जास्त समस्या येत आहे. अनेक विद्यार्थी पालक आधार मुख्य विभागीय कार्यालय मुंबई तसेच ठाणे या ठिकाणी जाऊनही त्यांचे आधार नूतनीकरण करावे लागले. तर काहींचा तो प्रयत्नही फसला. आधार नूतनीकरणास काय तांत्रिक समस्या आहे जे मुख्य कार्यालयात जाऊन सुद्धा निकाली लागत नाही. याची चौकशी यू.आई डी.ए आई.ने करणे गरजेचे असल्याचेही विद्यार्थी पालकांचे म्हणणे आहे.

काय आहे आधार नूतनीकरणाचे नियम :-

जर आधार अपडेट केले आणि ते प्रलंबित असेल तर ६० ते ९० दिवस अपडेट होण्याची प्रतिक्षा करावी लागते. त्याआधी जर आधार अपडेट नाही झाले तर त्याला परत आधार अपडेट करावे लागते. (latest marathi news)

Aadhaar card
Jalgaon Lok Sabha Election : अमळनेरला युती, आघाडीत राजकीय शांतता! मतदार संघात युती, आघाडीचा अजून एकही मेळावा नाही

नूतनीकरण केलेल्या आधार जर अपडेट झाले नसेल तर नियमानुसार मागील केलेले आधार नूतनीकरण व नंतर केलेला नूतनीकरण हे दोघे यू. आई डी.ए आई.डी कडून रद्द करण्यात येते. साधारणतः याच अडचणीत या भागातील अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तक्रारीचा ढीग

आधार मुख्य कार्यालयात नूतनीकरणाच्या तक्रारीचा ढीग आहे. मात्र त्याचे निवारण होत नाही. अनेक विद्यार्थ्याना घेउन त्याच्या पालकांनी आधारच्या मुख्य विभागीय कार्यालयात जाऊनही तक्रारी नोंदविल्या आहेत.

त्या ठिकाणी त्यांची फक्त तक्रार नोंदवली जाते नंतर त्यांना एक महिन्याच्या आत तुमचे आधार अपडेट होईल असे सांगण्यात येते तरी सुद्धा आधार अपडेट होत नसल्याने विद्यार्थी पालकांच्या पदरी निराशा पडली. ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करून तक्रार नोंदवून यू.आई डी.ए आई.कडून समस्या सुटत नसल्याने या भागातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्रस्त आहेत.

Aadhaar card
Jalgaon News : शेतकऱ्यांना प्रतीक्षा पीककर्जाची! बँका, विकास संस्थांमध्ये कर्ज वितरणाची तयारी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com