Jalgaon Lok Sabha: निवडणुकीच्या कामात पाल्यांच्या NEET परीक्षेची अडचण! 5 मेस परीक्षा; पालक असलेल्या शिक्षकांची ‘कसोटी’

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघांमध्ये १८ एप्रिलपासून नामनिर्देशपत्र दाखल करणे सुरू होऊन प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया अंमलात येणार आहे.
NEET exam
NEET examesakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 : एकीकडे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी शिखरावर आणि त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर असताना ५ मेस होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश पात्र अर्थात, ‘नीट’ परीक्षेच्या तयारीचा ताणही यंत्रणेवर असणार आहे.

जिल्ह्यातील काही केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्याचदरम्यान मतदानासंबंधी प्रशिक्षण असेल, तर मोठी पंचाईत होऊ शकते. शिवाय ज्यांचे पाल्य ही परीक्षा देणार आहेत, अशा मतदानाची ड्यूटी लागलेल्या पालकांचीही कसोटी लागणार आहे. (Jalgaon Lok Sabha election 2024 Difficulty in NEET exam work news)

देशभरात सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा माहोल आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघांमध्ये १८ एप्रिलपासून नामनिर्देशपत्र दाखल करणे सुरू होऊन प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया अंमलात येणार आहे. आपल्याकडे या दोन्ही मतदारसंघात १३ मेस मतदान होईल. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाभरातील १८ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती या संपूर्ण प्रक्रियेसाठी केली असून, त्यादृष्टीने या कर्मचाऱ्यांचे विविध टप्प्यातील प्रशिक्षणही सुरू आहे.

यंत्रणेवर निवडणुकीचा ताण

निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होत असताना पुढचे जवळपास तीन आठवडे म्हणजे, मतदान होईपर्यंत जिल्ह्यातील प्रशासकीय व पोलिस यंत्रणेवर कमालीचा ताण असेल. कारण, जिल्ह्यात रावेर व जळगाव असे दोन मतदारसंघ, ११ विधानसभेचे मतदारसंघ व त्या अंतर्गत एक तालुके, अशी रचना आहे. शिवाय रावेर मतदारसंघात बुलढाणा जिल्हातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ असून, त्यातील मलकापूर व नांदुरा असे दोन तालुकेही आहेत. त्यामुळे कामाचा मोठा व्याप, पसारा जिल्हा यंत्रणेकडे आहे.  (latest marathi news)

NEET exam
Jalgaon News: गाव, सोसायटीला, नगरांना सुवर्ण, रौप्य, कांस्य फलक! मतदारवाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा अभिनव उपक्रम

अशातच ‘नीट’ची परीक्षा

निवडणुकीच्या एकूणच कामाचा, तसेच बंदोबस्ताचा ताण प्रशासकीय व पोलिस यंत्रणेवर असताना, मतदानाच्या काही दिवस आधीच म्हणजे ५ मेस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश पूर्व परीक्षा होत आहे. दरवर्षापेक्षाही यंदा देशभरात ‘नीट’साठी विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्यामुळे गेल्या वर्षापेक्षा परीक्षा केंद्रांची संख्याही जास्त असेल.

जळगाव जिल्ह्यातही गेल्या वर्षाच्या तुलनेत काही केंद्र अधिक असतील, असे सांगितले जात आहे. अर्थात, या परीक्षेचा थेट जिल्हा प्रशासन, राज्य सरकारशी संबंध नाही. मात्र, परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थेव्यतिरिक्त कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त व अन्य गोष्टींची काळजी घ्यावी लागते, म्हणून या परीक्षेचाही ताण प्रशासकीय व विशेषत: पोलिस यंत्रणेवर असेल.

‘त्या’ पालकांची कसोटी

निवडणुकीच्या ड्यूटीत समाविष्ट केलेल्या काही पालकांचे पाल्य ‘नीट’ परीक्षा देत आहेत. त्यामुळे अशा पालकांची या परीक्षेमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. परीक्षेसाठी पाल्यांची ने- आण करायची, त्यांची तयारी, अशी अडचण या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी ‘इलेक्शन ड्यूटी’वाल्या कर्मचाऱ्यांची मोठी कसोटी लागणार आहे.

"‘नीट’ परीक्षा रविवारी (ता. ५) होणार आहे. सुरवातीला आम्ही याच दिवशी प्रशिक्षणाचा टप्पा ठेवला होता. मात्र, ही परीक्षा असल्यामुळे ते नियोजन रद्द करून प्रशिक्षण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. ६) होईल." - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

NEET exam
Raver Lok Sabha Constituency : ‘मेगा रिचार्ज’ला हवे राजकीय इच्छाशक्तीचे ‘चार्जिंग’! पुनर्भरण प्रकल्पाचे हवाई पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com