Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 : रावेरसाठी ॲड. पाटील, चौधरींची चर्चा; ॲड. रोहिणी खडसेंचा लोकसभा लढण्यास नकार

Jalgaon Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातर्फे लढण्यास आमदार एकनाथ खडसे यांनी तब्बेतीच्या कारणावरून नकार दिला आहे.

Jalgaon Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातर्फे लढण्यास आमदार एकनाथ खडसे यांनी तब्बेतीच्या कारणावरून नकार दिला आहे. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनी लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरीं तसेच आणखी दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा असून पक्षाचे नेते याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. (Jalgaon Lok Sabha Election Raver candidature of Adv Ravindra Patil and Santosh Chaudhary is being discussed)

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. पक्षातर्फे उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत बैठक झाली, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

माजी आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, राजीव देशमुख, इच्छूक उमेदवार अतुल पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते. ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाबाबत पक्षाने ठराव केला होता, त्यावर चर्चा करण्यात आली, त्यावेळी ॲड. खडसे यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Jalgaon News : करवाढ नसलेल्या फैजपूरच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

एकनाथराव खडसे यांनी आपली तब्बेत बरी नसल्यामुळे आपण लढवित नसल्याचे सांगितले. त्यानंतर पक्षातर्फे विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच आणखी दोन उमेदवार इच्छुक असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. उमेदवाराबाबत आता दोन दिवसात पक्षाचे नेते निर्णय जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲड. रवींद्र पाटील मुंबईला रवाना

पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील हे शुक्रवारी मुंबईत बैठकिला जाणार होते. मात्र वैयक्तिक कारणामुळे जावू शकले नव्हते. मात्र बैठकित त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. त्यामुळे पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना मुंबईला पाचारण केले आहे. शुकर्वारी रात्री ते मुंबईला रवाना झाले असून उद्या (ता.१६) पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Lok Sabha Election 2024
Jalgaon Anganwadi Sevika : गावपातळीवर अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची : आमदार चिमणराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com