Jalgaon NMU News : NMUत अभ्यासक्रमांसाठी 10 जुलैस प्रवेश परीक्षा; BBA, MCA चा समावेश

NMU Jalgaon News
NMU Jalgaon Newsesakal
Updated on

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बीबीए, बीबीएस, बीएमएस (ई-कॉमर्स), बीसीए, एमएमएस (कॉम्पुटर मॅनेजमेंट), एमएमएस (पर्सोनेल मॅनेजमेंट), एमसीए (Integrated) व एमबीए (Integrated) या वर्गाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा १० जुलैस होणार आहे.(Jalgaon NMU Update July 10 Entrance Exam for NMU Courses Including BBA MCA Jalgaon News)

अशी आहेत परीक्षा केंद्र

केसीई सोसायटीचे आयएमआर (जळगाव), ॲड. सीताराम आनंदरामजी बाहेती महाविद्यालय (जळगाव), भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, धनाजी नाना महाविद्यालय (फैजपूर), बी.पी. कला, एस.एम.ए. विज्ञान व के.के.सी. वाणिज्य महाविद्यालय (चाळीसगाव), झेड. बी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (धुळे), आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शिरपूर), आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट (शिरपूर), एस.टी.को. ऑप. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट (शहादा), नंदुरबार तालुका विधायक समितीचे जी. टी. पाटील कला, वाणिज्य महाविद्यालय.

NMU Jalgaon News
Jalgaon Municipal Corporation : शंभर कोटींतील कामाना ना-हरकत देऊ नये; महापौरांचे आयुक्तांना पत्र

यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) १९ जूनपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर भरण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत आहे. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी ६ जुलै २०२३ ला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रक्रिया शुल्क ५०० रुपये ऑनलाईन नेट बँकिंग आणि युपीआयद्वारे भरावयाचे आहे. भरलेला प्रवेश अर्ज व फीची पावती विद्यार्थ्यांनी स्वत:कडेच ठेवायची आहे. भरलेला अर्ज विद्यापीठ किंवा महाविद्यालयात जमा करावयाचा नाही. कृपया विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMU Jalgaon News
Jalgaon News : ‘नाल’ साठी काळ्या घोड्यांचे हाल; वन्यजीव संरक्षण सदस्यांनी थांबविली तस्करी

८ जुलै २०२३ ला पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. ९ जुलैला विद्यापीठ संकेतस्थळावर सामाईक प्रवेश परीक्षेचे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होतील. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो व त्यावर प्राचार्यांचा सही शिक्का घ्यावा, असे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा. ए. पी. डोंगरे, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा यांनी कळविले आहे.

NMU Jalgaon News
Jalgaon Crime News : दाणा Factoryतील चोरीप्रकरणी संशयिताला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com