Latest Marathi News | जळगाव पोलिस दलाच्या खेळाडूंची ऑलिंपिकसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: District Police Force Swimming Team with Coach Kamlesh Nagarkar

Jalgaon News : जळगाव पोलिस दलाच्या खेळाडूंची ऑलिंपिकसाठी निवड

जळगाव : महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांसाठी येथील पोलिस जलतरण तलावाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १२ जानेवारी दरम्यान ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा-२०२३ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये मॉडर्न पेटयथलॉन, वॉटर पोलो, ट्रायथलॉन अशा विविध जलतरण स्पर्धेसाठी जळगाव जिल्‍हा पोलिस दलाच्या जलतरण तलावाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली असून संघ गुरुवारी (ता.५) पुणे येथे दाखल झाला. ( Jalgaon Police Force Selection of athletes for Olympics Jalgaon Sports News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

वॉटर पोलो पुरुष संघांत-अमेय नगरकर, ओम चौधरी, तलाह सिद्दिकी, हर्षवर्धन महाजन, टीम मॅनेजर हिदायत खाटीक, मॉडर्न पेटयथलॉन स्पर्धेत- अमेय नगरकर, तलाह सिद्दिकी, हर्षवर्धन महाजन, ओम चौधरी, आयान शेख, लाजरी खाचणे, धनश्री जाधव, जान्हवी महाजन, टिम मॅनेजर कुमुदिनी खाचणे, दीपाली महाजन, कोच गजानन महाजन, रवींद्र चौधरी यांचा समावेश आहे.

ट्रायथलॉन स्पर्धेसाठी धनश्री जाधव, टिम मॅनेजर राजीव जाधव असे राहणार आहे. या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तांत्रिक पंच म्हणून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्याकडून कमलेश नगरकर, जयंत चौधरी, सूरज दायमा यांची निवड करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Nashik News : कामाच्या अनुभवावरून सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार! राज्य शासनाचा निर्णय