SAKAL Impact : पारोळ्यातील नवनाथ मंदिरासमोर महामार्गावर बसविले गतिरोधक

SAKAL Impact : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर गतिरोधक बसविण्यात यावे, यासाठी ‘सकाळ’ने संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते.
A speed breaker installed in front of Navnath Temple on National Highway 53.
A speed breaker installed in front of Navnath Temple on National Highway 53.esakal

SAKAL Impact : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर गतिरोधक बसविण्यात यावे, यासाठी ‘सकाळ’ने संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, त्याची दखल घेत अखेर राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर किसान महाविद्यालय, नवनाथ मंदिरासमोर गतिरोधक बसविण्यात आल्याने नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ५३ हा पारोळा शहरालगत गेला आहे. (Jalgaon Speed breaker was install on highway in front of Navnath temple in Parola)

या मार्गातून धरणगाव रस्ता, शहराचे प्रवेशद्वार, कासोदा रस्ता, चोरवड रस्ता, कजगाव रस्ता, उंदिरखेडा रस्ता, धुळे रस्ता, अमळनेर रस्ता तसेच कजगाव रस्ता लगेच मुख्य पारोळा शहर असे प्रमुख रस्ते जोडलेेले आहेत. प्रामुख्याने या महामार्गावर अनेक शैक्षणिक संकुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे या परिसरात भरधाव वेगाने वाहणारी वाहने मोठ्या प्रमाणात असतात. या महामार्गावर रहदारीचा भाग म्हणून गतिरोधक असावे, अशी मागणी पादचारी व स्थानिक रहिवाशांची होती.

A speed breaker installed in front of Navnath Temple on National Highway 53.
Jalgaon Rohit Pawar : आमदार रोहित पवार उद्या चोपड्यामध्ये

त्या पार्श्वभूमीवर मागील काळात ‘सकाळ’ने संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून राष्ट्रीय महामार्ग ५३ वर गतिरोधक असावे, अशी मागणी लावून धरली होती. त्याची दखल घेत संबंधित विभागाने या महामार्गावर गतिरोधक बसविले आहेत.

यासाठी ‘सकाळ’च्या पाठपुराला यश आले असून, वाचकांसह स्थानिक रहिवाशांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.

A speed breaker installed in front of Navnath Temple on National Highway 53.
Jalgaon Lok Sabha Election : रावेरला शरद पवार गटाकडून संतोष चौधरींच्या नावाला पसंती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com