Jalgaon News : चंद्रदर्शन झाल्यावरच खात्यात आला ईद ॲडव्हॉन्स; पोलिस अधीक्षक कार्यालयातील दप्तर दिरंगाईचा फटका

Jalgaon News : पोलिस कर्मचाऱ्यांना सण उत्सवासाठी फेस्टीव्हल ॲडव्हॉन्स देण्याचा नियम आहे.
Ramadan Eid
Ramadan Eidesakal

Jalgaon News : पोलिस कर्मचाऱ्यांना सण उत्सवासाठी फेस्टीव्हल ॲडव्हॉन्स देण्याचा नियम आहे. यंदाही रमजान ईदसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यापूर्वीच अर्ज केलेले असतांना चक्क ईदच्या पुर्वसंध्येला कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. दिवाळी असो की, रमजान चौकटीत आयुष्य जगणाऱ्या नोकरदारांना आर्थीक संकटात सापडल्याचा अनुभव येतोच. (Jalgaon While police personnel applied for Ramadan Eid two months ago but On eve of Eid amount was deposited)

दिवाळीची चाहूल दसऱ्यापासुनच लागते तर, रमजान महिण्यात महिनाभर आर्थीक खर्च आणि खरेदी सुरु असते. अशात महिन्याला पगार पुरत नाही. प्रामाणीक सरळ मार्गी सरकारी नोकरांची भिस्त ही सण उत्सवाच्या महिण्यात अग्रीम किंवा हात उसनवारी कर्जावर असते. जळगाव आणि धुळे,जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यावर यंदा तशीच परिस्थिती आली.

दोन्ही जिल्‍ह्‍यातील कर्मचाऱ्यांनी दीड-दोन महिने अगोदर फेस्टीव्हल ॲडव्हॉन्ससाठी अर्ज केला होता. मात्र, अगदी दुसऱ्या दिवशी सण आणि बुधवार (ता.१०) सायंकाळी साडे सहा ते रात्री दरम्यान खात्यात पैसे वर्ग झाल्याचे संदेश अर्ज करणाऱ्या पोलिसांना प्राप्त झाले.

उधारीवर सण साजरा..

पोलिस दलात सगळ्यांनाच वरकमाई असतेच असे नाही. अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे ड्युटी बजावत असतात. परिणामी, चाकोरीबद्ध आयुष्य जगणारे टिपीकल शासकिय नोकरांची मात्र पंचाईत होते. अतिरिक्त डुट्या, बंदोबस्त अन्‌ घरात आले की, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा तगादा, पोरांची वॉन्टेड लिस्ट कितीही तंगी याची तोंडमिळवणी करतांना यंदाही अनेकांना मित्र-सहकाऱ्यांकडून हात उसनवारी घेउनच यंदा सण साजरा करावा लागला. (latest marathi news)

Ramadan Eid
Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश जोरात; शिंदे गटाच्या अस्मिता पाटील शिवसेना ठाकरे गटात

चंद्रदर्शनानंतर संदेश..

ईदसाठी कौटुबीक साहित्य, कपडे, खाद्य पदार्थ, जकात वाटप अशा आर्थीक ताणाताणीत फेस्टीव्हल ॲडव्हॉन्स सहारा ठरतो. त्यात, वाहन कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा भार त्याचे कर्ज, यातून आलेला सणाचा खर्चात हातभार लागावा अशी अपेक्षत्त असते. मात्र, खात्यातील बाबुगिरी मुळे दर वर्षी फेस्टिव्हल ॲडव्हॉन्स पोलिस कर्मचार्यांना अगदी तरसवुन तरसवुन दिला जातो.

यंदा चक्क ईदच्या आदल्या दिवशी अर्थाच चंद्रदर्शन झाले अन्‌ बँकेत ॲडव्हॉन्सची रक्कम जमा झाली. हिच रक्कम अगोदर मिळाली असती तर, कुणाकडे उधारीसाठी हात पसरवायची गरज पडत नाही इतकीच पोलिस कर्मचार्यांची तक्रार आहे...दुसरं काहीच नाही.

Ramadan Eid
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यातील दिव्यांग, ज्येष्ठांच्या मतदानासाठी पुढाकार; प्रशासनाचा विशेष प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com