kirankumar Bakale Controvesy : अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

Kiran kumar Bakale
Kiran kumar Bakale esakal

जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही अटक केली जात नाही, असा आरोप करीत न्याय मागण्यासाठी सर्व जातिधर्मांच्या विविध संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून साखळी उपोषण करणार आहे, असे निवेदन बुधवारी (ता. ५) जिल्हाधाकारी व पोलिस अधीक्षकांना मराठा समाजातर्फे देण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बकालेंच्या अटकेसाठी घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, राम पवार, महेश पवार, नंदू पाटील, प्रमोद पाटील, अ. भा. छावा संघटना आयटी विभाग जिल्हाध्यक्ष केतन पाटील, अविनाश पाटील, प्रकाश पाटील, प्रा. डॉ. प्रवीण बोरसे, मधुकर पाटील आदींनी सहभाग घेतला.

Kiran kumar Bakale
Jalgaon Crime : गरीब हमाल तरूणावर चाकूहल्ला

या संघटना होणार सहभागी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, मराठा सेवा संघ, मराठा प्रीमियर लीग, लोकसंघर्ष मोर्चा, मराठा उद्योजक विकास मंडळ, संभाजी ब्रिगेड सामाजिक, जिजाऊ ब्रिगेड, ग. स. सोसायटीचे संचालक, बुलंद छावा संघटना, अखिल भारतीय युवा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी सेना, संभाजी ब्रिगेड राजकीय, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आदी जातिधर्मांच्या संघटना उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत.

Kiran kumar Bakale
Jalgaon : शहरातील रस्त्यातील ‘खड्ड्यां’ चे कधी होणार सीमोल्लघंन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com