Jalgaon Crime News : भगीरथ कॉलनीत बंद घर फोडले; दागिन्यांसह रोकड लंपास

robbery
robberyesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील भगीरथ कॉलनीतील वक्रतुंड अपाटमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड, असा एकूण दोन लाख ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. (locked house in Bhagirath Colony was broken into and cash and jewellery were looted jalgaon news)

वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये कांचन मधुकर कदम (वय २८) परिवारासह वास्तव्याला असून, खासगी नोकरी करून ते उदरनिर्वाह करतात. १४ ते १६ एप्रिलदरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा गैरफायदा घेत चोरट्याने बंद घर फोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोकड, असा एकूण दोन लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

robbery
Jalgaon Crime News : चहाची उधारी मागीतल्याने फुकट्यांना आला राग; विक्रेत्याच्या भावाला मारहाण

कांचन कदम घरी आल्यानंतर त्यांना घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले, तर घरातील सामान अस्तव्यस्त पडलेल्या दिसला. याबाबत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १७) रात्री साडेबाराला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहे.

robbery
Jalgaon Crime News : पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Two theft incidents in Loni, Ambegaon: Unknown burglars threatened an elderly woman and robbed her gold ornaments, while another gang broke into a locked house and stole jewellery and cash worth around ₹2.5 lakh.
सराफ व्यापाऱ्याला लुबाडले
Pune Robbery News Four Men Attack Cashier with Spray and Escape with Rs 8 Lakh Cash on Sinhagad Road
Crime
Marathi News Esakal
www.esakal.com