परंपरागत यात्रेला फाटा देत जुवार्डीकरांनी भरवली झाडांची यात्रा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्यावर काही बंधने आली जुवार्डी गावात दरवर्षी आई माय यात्रेचे आयोजन केले जाते.
Tree Planting
Tree Planting
Summary

अभिनेता सयाजी शिंदे ह्यांच्या 'सह्याद्री देवराई' सामाजिक संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'झाडांचे शतक, शतकांचे झाड' ह्या अभियानापासून प्रेरणा घेतली.



भडगाव : खानदेश (Khandesh) आषाढ महीन्यात गावोगावी प्रत्येक मंगळवारी ग्रामदेवीच्या यात्रा असतात. त्यात मोठ्याप्रमात बोकडांचा बळी दिला जातो. मात्र जुवार्डी च्या ग्रामस्थांनी (Villagers) आणि तरूणांनी यात्रेला फाटा देत 'झाडांची यात्रा' ही संकल्पना राबवत यात्रेवर होणारा खर्च झाडावर करण्याचा निर्णय घेऊन मोठा आदर्श उभा केला आहे. त्यांनी गावात तब्बल 600 झाडांची लागवड (Planting of trees) केली.

Tree Planting
चक्क..आई वडीलांचेच स्मृती मंदिर बनवले शेतात!


खानदेशातील गामीण भागात सालाबादाप्रमाणे येणाऱ्या ग्रामदेवदैवतांच्या यात्रा-जत्रा ग्रामस्थांसाठी मोठी पर्वणी असते. कुस्त्यांचे रंगणारे फड, पारावरील तमाशाची बारी, खेळण्याची, मिठाई ची दुकाने, लोककला. संसार उपयुक्त वस्तूंची दुकाने ह्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्यावर काही बंधने आली. जुवार्डी गावात दरवर्षी आई माय यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त पाऊणे मंडळी पाऊणचारासाठी गावात दाखल होत असतात. काही अनिस्ट प्रथाही यात्रेसोबत जोडलेल्या आहेत. त्यात मांसाहार, झिंगाट हजारो रुपयांची उधळण केली जाते.

जुवार्डीत 'झाडांची यात्रा'

जुवार्डी गावाच्या सर्वांगीण विकासात भूमिपुत्र व्हाट्सएप्प ग्रुपचे मोठे योगदान मागील काही वर्षांपासून राहिले आहे. अभिनेता सयाजी शिंदे ह्यांच्या 'सह्याद्री देवराई' सामाजिक संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'झाडांचे शतक, शतकांचे झाड' ह्या अभियानापासून प्रेरणा घेऊन जुवार्डी येथील रहिवासी व धुळे येथील एस. एस. व्ही. पी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र पाटील ह्यांनी आई माय यात्रेनिमित्त 'झाडांची जत्रा' उपक्रम राबवून गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड अभियान राबविण्याची संकल्पना भूमिपुत्र ग्रुपच्या सदस्यांकडे मांडली. सगळ्या सदस्यांनी ह्या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवत वृक्ष रोपे घेण्यासाठी लोकवर्गणी व आई माय यात्रेनिमित्त श्रमदानातून झाडांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले.

Tree Planting
जळगावातील बलून बंधारे, टेक्स्टाईल पार्कसाठी पंतप्रधानांना साकडे

ऑनलाईन पद्धतीने लोकवर्गणी
प्रा. राजेंद्र पाटील ह्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भूमिपुत्र गृपच्या सदस्यांनी रोपे घेण्यासाठी लोकसहभागातून पन्नास हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा केले. भूमिपुत्र ग्रुपचे सदस्य ठाणे अंमलदार प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भागवत पाटील, सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय पाटील व भूषण पाटील यांनी मदत केली. लोकवर्गणीतून 600 विविध देशी झाडांच्या रोपांची चाळीसगाव, एरंडोल येथील नर्सरीतून खरेदी करण्यात आली. वड, पिंपळ, लिंब, चिंच, शीशम, चांदणी अश्या देशी झाडांना प्राधान्य देण्यात आले. बापू पाटील ह्यांनी वृक्षरोपांच्या वाहतुकीसाठी मदत केली व आधार पाटील ह्यांनीं रोपांची काळजी घेतली.

Tree Planting
घराच्या छतावर छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला मृत अर्भक

यात्रेच्या दिवशी वृक्षारोपण
आई- मरी यात्रेच्या निमित्त बाहेरगावाला नौकरीला असलेले भूमिपुत्र गावाकडे वृक्षलागवड साठी आले होते. जुवार्डी ग्रामस्थ, भूमिपुत्र ग्रुपचे सदस्य, प्रा. डॉ .व्ही. यु. पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच सुनीता ठाकरे, उपसरपंच पी ए पाटील ह्यांनी वृक्षलागवड करण्यासाठी मदत केली. अभिनेते सयाजी शिंदे ह्यांनी 'सह्याद्री देवराई' च्या झाडांचे शतक ह्या अभियानात सहभागी होऊन गाव यात्रेनिमित्त वृक्षलागवड केल्याबद्दल जुवार्डी ग्रामस्थांचे व भूमिपुत्र ग्रुपच्या सदस्यांचे संदेश पाठवून अभिनंदन केले. सयाजी शिंदे ह्यांनी जुवार्डी करांच्या उपक्रमाचे 'झाडांची जत्रा' असे करून प्रत्येक गावाने जत्रेनिमित्त वृक्षारोपण केले पाहिजे असे आवाहन केले. दरम्यान सरपंच सुनीता ठाकरे व उपसरपंच पी. ए . पाटील ह्यांनी गाव यात्रेनिमित्त वृक्षलागवड अभियान राबविल्याबद्दल भूमिपुत्र ग्रुपच्या सदस्यांचे आभार मानले. स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत मार्फत पुन्हा वृक्षलागवड करणार असल्याचे तसेच 'बिहार पॅटर्न' प्रमाणे ही मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण व संवर्धन करून गाव हिरवेगार करण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com