esakal | नुकसानग्रस्तांना दिली जाणार तातडीने मदत-मंत्री जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Jayant Patil Inspection of damaged villages

नुकसानग्रस्तांना दिली जाणार तातडीने मदत-मंत्री जयंत पाटील

sakal_logo
By
आनंन शिंपी


चाळीसगाव ः शहरासह तालुक्यात झालेली अतिवृष्ठी ( Heavy rain) व पुरामुळे (Flood) ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्तांच्या (Flood victims) नुकसानीचे पंचनामे करुन त्याचा अहवाल प्राप्त होताच, शासनाकडून तत्काळ योग्य ती मदत दिली जाईल, असे आश्‍वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी दिले. मंत्रिमहोदयांच्या या आश्‍वासनामुळे नुकसानग्रस्तांच्या अपेक्षा उंचावल्या असून या संकटातून (Crisis) सावरण्यासाठी सर्वांना आता प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..

चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांना पूर आले. ज्यात एक महिला वाहून गेली, हजारो जनावरे मृत्यूमुखी पडली. नदीचे पाणी विशेषतः नदीकाठच्या परिसरातील दुकानांमध्ये शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले. शेतीतील पिकेही जमिनदोस्त झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. या सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज शहरात आले होते. येथील रेल्वे स्थानकावर पहाटे ३ वाजून ४० मिनीटांनी त्यांचे आगमन झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत पाटील, नगरसेवक श्‍याम देशमुख, भगवानसिंग पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. अनेकांनी आपापल्या मागणीचे निवेदन मंत्र्यांना दिले. मंत्री जयंत पाटील यांनी या निवेदनांची दखल घेत, तेथूनच संबंधित अधिकार्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा: जळगावात ४ हजार विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षेला मारली दांडी


दुकानांमध्ये पाहणी
माजी आमदार राजीव देशमुख यांच्या ‘राजगड’वर काही वेळ थांबून मंत्री जयंत पाटील यांनी पीर मुसा कादरीबाबा, रिंग रोड, चामुंडा माता मंदिर, शिवाजी घाट परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. ज्यांच्या दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले होते, अशा दुकानदारांच्या प्रत्यक्ष दुकानात जाऊन त्यांच्याशी झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा केली.शहरातील नदीपात्रात सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेल्या अवैध बांधकामासंदर्भातील तक्रारी अनेकांनी केल्याचे सांगून मंत्री पाटील यांनी त्या अनुषंगाने आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हे अवैध बांधकाम काढण्याचे निर्देश देत असल्याचे सांगितले. पाहणी दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मंत्री जयंत पाटील यांनी अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

हेही वाचा: फेरफटका मारणाऱ्यांच्या समोर आला..आणि पसरली भीती


ग्रामीण भागात पाहणी
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या वाघडू, वाकडी, जावळे, रोकडे, मजरे, हातले गावातील नुकसानाची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. ज्या गावांना संरक्षण भिंतीची तातडीने गरज आहे, अशा गावांचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना करुन त्यासाठी आपण लगेचच निधी उपलब्ध करुन देऊ असे सांगितले. या गावांच्या पाहणीनंतर नागदला आमदार उदयसिंग परदेशी यांच्याकडे काही वेळ थांबून मंत्री जयंत पाटील हे औरंगाबादकडे सायगव्हाणमार्गे रवाना झाले.

loading image
go to top