esakal | जळगावात ४ हजार विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षेला मारली दांडी
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC exam

जळगावात ४ हजार विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षेला मारली दांडी

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा २०२० च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी ११ ते १२ या वेळेत झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून ११ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील ७ हजार ५४० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी (MPSC Exam) हजर होते. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील (Deputy Collector Rahul Patil) यांनी दिली. या परीक्षेत ३ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

हेही वाचा: सायबर क्राईम:ऑनलाईन साडीचा परतावा वृध्दाला पडला महागात

जळगाव जिल्ह्यातील ३५ परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी ११३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीसांनी बंदोस्त ठेवला होता. एमपीएससी परिक्षा अनेक विद्यार्थ्यांचे आयूष्य बदलवित असते. मात्र आज तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली नाही. विविध कारणे असतील परिक्षा न देण्याचे मात्र एमपीएससी परिक्षेत पास झाले तर भविष्य उज्वल असू शकते. असे असताना अनेकांनी परिक्षेला दांडीच मारल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


हेही वाचा: फेरफटका मारणाऱ्यांच्या समोर आला..आणि पसरली भीती

नियमांचे पालक करतांना उडाला गोंधळ

शहरासह जिल्ह्यात अनेक परिक्षांचे केंद्रे होते. कोरोना नियमांचे पालन करताना गोंधळ होईल. अशी शक्यता होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सर्वच विद्यार्थ्यांना वेळेच्या आधी दीड तास बोलाविल्याने सर्वांची तापमान तपासणी करता आली. सोबत ज्या वस्तू परिक्षा केंद्रात नेण्यास बंदी होती त्याही जप्त करण्यात आल्या. सर्वांना ओळखपत्र त्यांचेच आहे ना याची तपासणी करून परिक्षा केंद्रात सोडण्यात आले होते.

हेही वाचा: कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..

पालकांचीही गर्दी
परिक्षा केंद्राबाहेर परिक्षार्थी सोबतच पालक, पती, पत्नीचे गर्दी आज पहावयास मिळाली. सकाळी नऊ पासूनच परिक्षा केंद्राच्या बाहेरील परिसरात गर्दी होती.

loading image
go to top