esakal | पोलीसांनी पकडलेला गुटख्याचा ट्रक आमदार चव्हाणांनी पून्हा पाठलाग करून पकडला !
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीसांनी पकडलेला गुटख्याचा ट्रक आमदार चव्हाणांनी पून्हा पाठलाग करून पकडला !

ट्रक मेहुणबारे पोलिसांनी का सोडला त्या पोलीस ठाण्यात  गुन्हा का दाखल केला नाही.यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस व श्री चव्हाण यांच्यामध्ये तीन तास वाद चालला. 

पोलीसांनी पकडलेला गुटख्याचा ट्रक आमदार चव्हाणांनी पून्हा पाठलाग करून पकडला !

sakal_logo
By
दिपक कच्छवा

मेहुणबारे ता. (चाळीसगाव ) : स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे सुमारे पन्नास लाखाचा गुटखा घेवून जाणारा ट्रक पकडला. वरिष्टांच्या आदेशानुसार हा ट्रक जळगाव येथे आणत असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून हा ट्रक शिरसोली येथील जैन व्हली येथे पहाटे चार वाजता पकडला. जेथे ट्रक पकडला तेथेच गुन्हा दाखल का केला नाही अशी तुतू मेमे पोलिस व आमदारांमध्ये झाली. त्यानंतर जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रक आणून सर्व गुटख्याचा मालाची मोजणी करण्यात आली.

आवश्य वाचा- गांजा तस्करीत चाळीसगाव कनेक्शन; पोलीसांनी तीन संशयितांना घेतेले ताब्यात 
 

चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मेहुणबारे  (ता.चाळीसगाव) हद्दीत सुमारे 50 लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला सुमारास मेहुणबारे येथुन  हा ट्रक जळगावला गुन्हे शाखेचे पथक आणीत असताना शिरसोली – जळगाव दरम्यान जैन व्हँली जवळ हा ट्रक पहाटे 4 वाजता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अडविला. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला हा ट्रक आणून ट्रकमधील गुटख्याची मोजणी सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

धुळे येथून निघालेल्या ट्रक क्रमांक (MH18 M0553 )हा गुटख्याचा ट्रक  मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे महेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त  माहितीवरून एका ट्रक मध्ये अवैध रित्या गुटखा जात असल्याची माहिती मिळाली.या संशयावरून मेहुणबारे येथे गुन्हे शाखेच्या पथकातील यांनी हा ट्रक अडविला या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये अंदाजे 50 लाखांच्या वर अवैध गुटखा साठा असल्याचे दिसून आले. 

आवर्जून वाचा- मेळघाट-अनेर संचार मार्ग प्रस्ताव लागणार मार्गी !
 


मंगेश चव्हाण यांनी केला पाठलाग

पन्नास लाखाचा गुटखा असलेला  ट्रक वरिष्ठांच्या सुचनेनुसार जळगाव येथे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करून सदर कारवाई करण्याचे सागण्यात आले. त्या आदेशानुसार जळगाव गुन्हे शाखेचे कर्मचारी हा  ट्रक  घेऊन जात असतांना पहाटे 4 वाजेच्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांनी हा ट्रक शिरसोली गावाजवळील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन व्हॅली येथे पाठलाग करून थांबविला.आणि या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली. हा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी का सोडला त्या पोलीस ठाण्यात  गुन्हा का दाखल केला नाही.यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस व श्री चव्हाण यांच्यामध्ये तीन तास वाद चालला असल्याचे समजते.यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुढे यांच्या सुचनेनुसार अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणण्यात आला. तेथे आता सर्व गुटख्याच्या गोण्या ट्रकमधून उतरवून त्याची मोजणी  पोलिस यंत्रणा करीत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे