चोपडा येथे प्रतिबंधित क्षेत्रात वाढ...नियमांचे पालान करण्याचे प्रशासनाकडून आवाहन 

सुनील पाटील 
गुरुवार, 28 मे 2020

शहरातील आठही प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक बिनधास्त वावरत आहेत. त्यांना लगाम लावण्याची गरज आहे.

चोपडा ः शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चोपडेकर चांगलेच धास्तावले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

नक्की वाचा :घराचा दरवाजा उघडताच...समोर दिसली दुर्दैवी घटना, मायलेकाचे आढळले मृतदेह ! 
 

आदर्श नगर मधील पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आले. तेथूनच पुन्हा रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यात कोष्टी गल्ली तील वृद्ध पुणे येथे मुलाकडे गेले. तेथे पॉझिटिव्ह येऊन त्यांचा मृत्यूही झाला. केजीएन कॉलनीतील ५२ वर्षीय पुरुष नाशिक येथे खाजगी हॉस्पिटलला उपचार घेत असताना तो ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तीने क्वॉरंटाईन करण्यात येत असल्याने त्याचीही संख्या वाढली आहे. सद्यःस्थितीत कोरोना बाधित २६ रुग्ण झाले असून यातून ५ मृत्यू, तर १४ जण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. सात रूग्ण हे रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मंगळवारी (ता. २७) गणेश कॉलनीतील किराणा दुकानदार (नाशिक) येथे पॉझिटिव्ह आल्याने ६६ संशयितांना क्वारंटाईन करण्यात आल्याने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे.

क्‍लिक कराः जळगाव जिल्ह्यात आणखी 29 कोरोना बाधित रुग्ण आढळले 
 

यात ४५ व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. शहरातील आठही प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक बिनधास्त वावरत आहेत. त्यांना लगाम लावण्याची गरज आहे. यात मल्हारपुरा, खुर्शीद अळी, बेलदार अळी, आदर्श नगर, भाट गल्ली, केजीएन कॉलनी, कोष्टी गल्ली, बारगन अळी, गणेश कॉलनी यांचा समावेश आहे. प्रशासन ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले त्या भागात प्रशासन बॅरिकेट्स लावणे, तो भाग सॅनिटाइझ करणे, संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करणे अशी यंत्रणा राबविली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी अनेक दुकानावर, बँक, यासह अनेक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्स पाळताना दिसून येत नाही. गावनिहाय रुग्ण संख्या ः अडावद ०५, चोपडा २१, खुर्शिद अली ०६, मल्हारपूरा ०१, बेलदारअळी ०२, आदर्शनगर ०२, कोष्टी गल्ली ०३, केजीएन ०२, बारगन गल्ली ०१, गणेश कॉलनी ०१. 

 आर्वजून पहा :  कंडारीतील गृहस्थाचा दगडाने ठेचून खून ;रात्री सोबत मद्यप्राशन करणारा मित्र ताब्यात 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Chopda Increase in restricted area at Chopda, Appeal from the administration to follow the rules