esakal | केळीला बोर्ड भाव द्यावा..तहसीलदारांनी दिल्या सुचना
sakal

बोलून बातमी शोधा

Banana

केळीला बोर्ड भाव द्यावा..तहसीलदारांनी दिल्या सुचना

sakal_logo
By
सुनील पाटील


चोपडा : केळी उत्पादक शेतकऱ्यांची (Banana growers) होणारी आर्थिक पिळवणूक (Financial fraud) थांबावी, तसेच केळी मालाला बोर्ड भाव (Board prices for banana goods) मिळावा, याबाबत बाजार समितीने लक्ष घालून व्यापाऱ्यांशी चर्चा करून केळीचे बोर्ड भाव लावावेत. रावेर, यावल या ठिकाणी भाव बोर्ड लावले जातात, परंतु चोपड्यातच का केळी बोर्ड भाव लावले जात नाही, याचा अभ्यास करावा, ते कसे लावता येईल, यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना बैठकीत तहसीलदार अनिल गावित यांनी दिल्या.

हेही वाचा: अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही..!


बैठकीस बाजार समिती सभापती दिनकर देशमुख, केळी पीकविमा तक्रार निवारण समिती सदस्य तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, कृषी अधिकारी प्रशांत देसाई, सहाय्यक उपनिबंधक प्रतिनिधी, बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे, केळी व्यापाऱ्यांमधून शिव केला एजन्सी, वामनराव भाऊ फ्रूट सेल सोसायटी यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

अधिकृत व्यापाऱ्यांनाच माल द्यावा..
बैठकीत केळी व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली, तसेच निवेदन देण्यात आले. बाजार समिती संचालक मंडळाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याचे तहसीलदार गावित यांनी सांगितले. तसेच केळी बोर्ड लावून त्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांना भाव देण्यात यावा, तसेच परवानाधारक, अधिकृत व्यापारी यांनाच माल देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चोपडा बाजार समितीत अधिकृत नोंदणीधारक केळी व्यापारी चोपडा शहरात १६, तर अडावद येथे १० असे एकूण २६ व्यापारी आहेत. त्यांनाच माल देण्यात यावा.

हेही वाचा: ‘त्या’ महसूल मंडळांना आगाऊ २५ टक्के रक्कम


बैठकीस व्यापाऱ्यांची पाठ
केळी उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, यासाठी मंगळवारी (ता. ३१) तहसीलदार गावित यांनी बैठक घेतली. बैठकीस चोपडा बाजार समितीत अधिकृत नोंदणीधारक २६ केळी व्यापारी असून, फक्त दोनच व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. २४ व्यापाऱ्यांनी बैठकीकडे पाठ केली. या बैठकीत शेतकरी पांडुरंग पाटील, भटू पाटील, नामदेव पाटील, सुधाकर पाटील, डॉ. मनोज पाटील (विटनेर), डॉ. संजय पाटील, सोपान पाटील, मच्छिंद्र पाटील, कैलास पाटील, जितू पाटील, बाळू पाटील, तुषार पाटील, भरत पाटील, विटनेर, वढोदा, दगडी, मोहिदा या गावांतील तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

केळी बोर्ड भाव मार्केट लावू शकत नाही, संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत व्यापाऱ्यांना बोलावून चर्चा होईल. केळी बोर्ड लावण्यासाठी अगोदर शेतकऱ्यांसह काही संचालक मंडळाची कमिटी स्थापन करावी लागेल. रावेरला कमिटी स्थापन झाली आहे. त्यामुळे बोर्ड लावतात.
-रोहिदास सोनवणे, सचिव, बाजार समिती, चोपडा

हेही वाचा: खरेदीपूर्वीच मलिदा लाटणाऱ्या आरोग्य विभागाचे पितळ उघड

रावेर, यावल यापेक्षा थोडाफार भाव कमी मिळाला तरी चालेल पण बोर्डभावाप्रमाणे कापणी करावी. ऐनवेळी शेतात भाव करू नये, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अधिकृत व्यापाऱ्यांनीच माल खरेदी करावा.
-एम. व्ही. पाटील, सदस्य
केळी पीकविमा तक्रार निवारण समिती तथा माजी उपसभापती

loading image
go to top