लिपीकाची कमाल; बायको, शालकाच्या खात्यात लाखो रुपये वर्ग करून केला घोटाळा

१३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वर्ग करताना बँकेला एकच खाते क्रमांक वारंवार येत असल्याचे लक्षात आले.
fraud
fraudfraud

जळगाव : रेल्वेस्थानकाजवळील संजय गांधी योजना विभागातील सहाय्यक लिपिकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्नी व शालकाच्या बँक खात्यात परस्पर १३ लाख ९० हजार रूपये वर्ग करून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी लिपिकासह त्याची पत्नी व शलाकाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

fraud
राज्यातील ६६ वर शिक्षकांचा कोरोना सेवेत मृत्यू

संजय गांधी योजना ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्र कार्यालयातील सहाय्यक लिपिक संदीप प्रल्हाद शिरसाठ (रा. ओम साईरामनगर, वाघनगर) याने बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी सोनल शिरसाठ आणि स्वत:च्या खात्यात नोव्हेबर ते डिसेंबर २०२० या दोन महिन्यांच्या योजनेचे बिल अनुक्रमे २० हजार आणि ४० हजार रुपये वर्ग करून घेतले. नंतर जानेवारी ते मार्च २०२१ च्या योजनांच्या बिलांमध्येही फेरफार करून पत्नी सोनल शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव यांच्या खात्यात १३ लाख ५० हजार रुपये वर्ग व्हावे, यासाठी दोघांचे खाते क्रमांक दिले होते. बँकेकडून पैसे वळते होताना संगणकात हा सर्व प्रकार समोर आल्याने चौकशी सुरू झाली.

fraud
संकटकाळात कोविड सेंटरच्या मदतीला धावले शिवदुर्ग प्रतिष्ठान

एकसमान खाते क्रमांकाने गोची

लिपिक संदीप शिरसाठ याने गेल्या वेळस पत्नी व स्वतःच्या नावे ६० हजार वळते करून घेतल्याने त्याची हिंमत वाढली. परिणामी, त्याने मोठी रक्कम लाटण्यासाठी पत्नी सेानल व तिचा भाऊ संदीप भालेराव यांचे खाते क्रमांक दिले होते. मात्र, १३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वर्ग करताना बँकेला एकच खाते क्रमांक वारंवार येत असल्याचे लक्षात आले. नंतर बँकेने थेट संजय गांधी योजनेचे तहसीलदारांना पत्र कळवून दोन नावे वेगवेगळी आणि खाते क्रमांक एकच असल्याचे कळविले.

fraud
मनपा ‘ॲक्शन मोड’वर; हॉटस्पॉट, एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये टेस्टिंग

लाभार्थी वेगळे अन्‌ खाते वेगळेच

तहसीलदारांनी मुळ लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर दिलेले खाते क्रमांक आणि लाभार्थ्यांची खाते यात तफावत आढळून आली. प्राप्त दस्तऐवजावरून संबंधित लिपिक आणि रक्कम वळती होणाऱ्यांचे परस्पर संबध उघड होऊन सहाय्यक लिपिक शिरसाठ याने शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अनिल पठाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक लिपिक संदीप शिरसाठ, सोनल संदीप शिरसाठ आणि संदीप अशोक भालेराव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com